हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील बहुतेक जिल्ह्यांमध्ये आज पावसाचा जोर कमी झाल्याचं पाहायला मिळेल.
राज्यात आज तीन जिल्ह्यांमध्येच मुसळधार पावसाचा अंदाज आहे
यात रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदूर्ग या जिल्ह्यांचा समावेश असून या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे
इतर जिल्ह्यांमध्ये पाऊस कमी असेल
पुढच्या 4,5 दिवसात कोकणात पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे
पुढच्या 4-5 दिवसात कोकणातही मध्यम सरी बरसतील
मुंबई आणि पुण्यातही आज कोणताही अलर्ट नसून पावसाचा जोर कमी असेल