या काळात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी मुसळधार पाऊस हजेरी लावेल
तर मराठवाडा आणि इतर काही भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे
आज विदर्भातील बहुतेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे
यासोबतच कोल्हापूर, सिंधुदूर्ग आणि रत्नागिरीमध्येही आज मुसळधार पावसाची शक्यता आहे
दरम्यान, पालघर, वाशिम, यवतमाळ, नंदूरबार या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली आहे
17 जुलैपर्यंत विदर्भातील सगळ्याच जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे
त्यामुळे या भागातील शेतकरी सुखावले आहेत.