आज राज्यातील 7 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे
पुण्यात आणि मुंबईतही आज अतिमुसळधार पाऊस हजेरी लावेल
ठाणे, पुणे, मुंबई, कोल्हापूर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदूर्ग या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
या सातही ठिकाणी आज अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे
रायगड,रत्नागिरी आणि सिंधुदूर्गमध्ये पुढील आणखी तीन दिवस पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
तर विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार पावसाची शक्यता असून यलो अलर्ट देण्यात आला आहे.
बुधवारी राज्यात पावसाचा जोर आणखी काही प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे