आज मुंबईत मुसळधार पाऊस हजेरी लावणार आहे
मुंबईत आज अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
तर पुण्यातही आज अतिमुसळधार पाऊस बरसणार असून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे
पुढील 5 दिवसांत महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे
विदर्भातील जवळपास सगळ्याच जिल्ह्यांना आज मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे
ठाणे, रत्नागिरी, रायगड, सातारा, कोल्हापूर आणि सिंधूदुर्ग या जिल्ह्यांमध्येही ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे
हवामान खात्याचे वरिष्ठ अधिकारी कृष्णानंद होसाळीकर यांनी मुंबईकरांना घराबाहेर पडण्याआधी विशेष काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे