मुंबईत आजपासून 2 दिवस मुसळधार अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे
मंगळवारी मुंबईत पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून बुधवारी यलो अलर्ट आहे
त्यामुळे कामासाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांनी काळजी घेण्याचा सल्ला दिला गेला आहे.
याशिवाय राज्याच्या इतरही काही भागांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे
यात नाशिक, पुणे, पालघर, ठाणे, सातारा, रत्नागिरी, रायगड या जिल्ह्यांनाही ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे
या जिल्ह्यांमध्येही आज अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे
हवामान विभागाने कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज/यलो अलर्ट जारी केला आहे.