शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्या गाडीचा मुंबई-पुणे एक्सप्रेसवर अपघात झाला. या अपघातानंतर उपचारादरम्यान मेटे यांचं निधन झालं
हा अपघात इतका भीषण होतो, की घटनेत फॉर्च्युनर गाडीचा अक्षरशः चुराडा झाला
अपघातानंतरचे त्यांच्या गाडीचे काही फोटो समोर आले आहेत. यामध्ये फॉच्युनर गाडीचा पुढील भाग चक्काचूर झालेला दिसतो.
अपघातानंतर गाडीचं चाकही तुटलेलं दिसतं. खोपली इथल्या बातम बोगद्याजवळ हा अपघात घडला.
आज पहाटे साडेपाच वाजता हा अपघात झाला आहे. अपघातामध्ये विनायक मेटे यांना गंभीर दुखापत झाली होती.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मराठा आरक्षणासाठी बैठक बोलावली होती. या बैठकीसाठी विनायक मेटे हे रात्रीच रवाना झाले होते