NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / महाराष्ट्र / जय हिंद कॉलेज ते राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्ष, सुप्रिया सुळेंची आजपर्यंत समोर न आलेली खास माहिती PHOTOS

जय हिंद कॉलेज ते राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्ष, सुप्रिया सुळेंची आजपर्यंत समोर न आलेली खास माहिती PHOTOS

सुप्रिया सुळे यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. सुप्रिया सुळे यांचा या पदापर्यंतचा प्रवास कसा राहिला? (जितेंद्र जाधव, प्रतिनिधी)

18

खासदार सुप्रिया सुळे या बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडून येतात. त्यांचा जन्म 30 जून 1969 रोजी पुणे येथे झाला त्यांचे शिक्षण बीएससी मायक्रोबायोलॉजी जय हिंद कॉलेज मुंबई येथे झाले.

28

खासदार सुप्रिया सुळे या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची एकुलती एक कन्या. गेल्या दीड दशकाहून अधिक काळ सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात त्यांनी घालवला आहे.

38

30 जून 1969 साली सुप्रिया सुळे यांचा पुण्यात जन्म झाला. मुंबईतील जयहिंद कॉलेजमध्ये त्यांचं शिक्षण पूर्ण झालं. सूक्ष्मजीवशास्त्रामध्ये त्यांनी बीएससी केलं आहे.

48

4 मार्च 1991 रोजी सदानंद भालचंद्र सुळे यांच्याशी त्यांचा विवाह झाला. त्यांना एक मुलगा (विजय) आणि एक मुलगी (रेवती) ही दोन अपत्ये आहेत. लग्नानंतर त्यांनी कॅलिफोर्नियामध्ये काही काळ घालवला, जिथे त्यांनी यूसी बर्कलेमध्ये जल प्रदूषणाचा अभ्यास केला. त्यानंतर त्या इंडोनेशिया आणि सिंगापूरला गेल्या आणि नंतर मुंबईला परतल्या.

58

सुप्रिया सुळे यांची 2006 मध्ये महाराष्ट्रातून राज्यसभेवर बिनविरोध निवड झाली. त्यानंतर 2009 मध्ये बारामती लोकसभा मतदारसंघातून त्यांनी पंधरावी लोकसभा निवडणूक जिंकली.

68

2018 मध्ये लोकसभेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेत्या म्हणून त्यांची निवड झाली तर 2019 मध्ये पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेत्या म्हणून लोकसभेत फेर निवड करण्यात आली.

78

सुप्रिया सुळे यशवंतराव चव्हाण सेंटर या संस्थेवर कार्याध्यक्ष म्हणून पवार चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई या संस्थेवर कार्याध्यक्ष, महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळ या संस्थेच्या अध्यक्षपदी, मौलाना आझाद एज्युकेशन ट्रस्ट या संस्थेवर उपाध्यक्ष म्हणून, नेहरू सेंटर मुंबई या संस्थेवर विश्वस्त म्हणून, रयत शिक्षण संस्थेवर सदस्य म्हणून, मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय या संस्थेवर विश्वस्त म्हणून, विद्या प्रतिष्ठान या संस्थेवर विश्वस्त म्हणून तर एग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट या संस्थेवर विश्वस्त म्हणून त्या पद भुषवत आहेत.

88

सुप्रिया सुळे संसद महारत्न संसद विशिष्ट रत्न पुरस्काराने सन्मानित असून सलग सात वर्षे संसद रत्न पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला आहे.

  • FIRST PUBLISHED :