सोनू सूद अभिनयासोबतच त्याच्या समाजसेवेसाठी ओळखला जातो. लॉकडाऊनमध्ये लोकांना मदत करत तो चर्चेत आला. आता आज महाराष्ट्रातील एका गावात त्याच्या फाउंडेशनकडून एक शाळा सुरु करण्यात आली आहे.
सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ येथे सोनू सूद चॅरिटी फाउंडेशनच्या माध्यमातून वैष्णवी इंग्लिश मॉडेल स्कूल सुरू झालं आहे.
त्या शाळेविषयी माहितीचा व्हिडिओ सोनू सूद यांनी पोस्ट केला आहे.
सामान्य घरातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळण्यासाठी फाउंडेशनच्या मदतीने वैष्णवी इंग्लिश मॉडेल स्कूल सुरु करण्यात आलं आहे.
या व्हिडिओमध्ये सोनू सुदने पालकांनी आपल्या पाल्याचा प्रवेश घ्यावा यासाठी समस्त मोहोळ वासियांना आवाहन केले आहे.
उत्कृष्ट दर्जेदार संस्कारक्षम व कृतीयुक्त शिक्षण देण्याचा निश्चय सूद फाउंडेशनने केला असून त्याकरिता वैष्णवी इंग्लिश मॉडेल स्कूलची स्थापना केली आहे असे सोनू सुद यांनी सांगितले.
त्यावेळी त्यांनी शाळेत प्रवेश घेण्यासाठी सूद फाउंडेशनचे विपुल मिरजकर व विशाल काळे सर यांच्याशी आणि शाळेमध्ये प्रत्यक्ष संपर्क साधण्यास सांगितले आहे.
इंग्लिश मीडियमची फी जास्त असते त्यामुळे सामान्य मुलांना ते शिक्षण परवडत नाही. पण या शाळेत प्रवेश घेणाऱ्या मुलांची फी सूद चॅरिटेबल फाउंडेशन भरणार आहे.
मात्र गणवेश पुस्तकांची फी विद्यार्थ्यांनी भरायचे आहे. थोडक्यात अल्प दरात विद्यार्थ्यांना इंग्लिश मीडियमचे शिक्षणाचा लाभ मिळणार आहे.