आज पावसाळी अधिवेशनाचा दुसरा आठवडा आहे, दुसऱ्या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी आक्रमक भूमिका घेतली.
रोहित पवार भर पावसात विधानभवन परिसरात उपोषणाला बसले होते.
कर्जत, जामखेडमध्ये एमआयडीसी व्हावी या मागणीसाठी रोहित पवार यांनी उपोषण सुरू केलं .
दरम्यान 'पाऊस असो वा इतर कोणताही अडथळा, जोपर्यंत माझ्या मतदारसंघातील युवांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत हलणार नाही' असं ट्विटही रोहित पवारांकडून करण्यात आलं होतं.
मात्र त्यानंतर काही वेळातच रोहित पवार यांनी आपलं आंदोलन मागं घेतलं