पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतलं विठुमाऊलीचं दर्शन, वारकऱ्याच्या वेशात विनम्र अभिवंदन
पंतप्रधान मोदींनी संत तुकारामांच्या पादुका असलेल्या पालखीचं दर्शन घेत नमस्कार केला.
मोदींनी वारकऱ्यांची वीणा आणि चिपळ्या हातात घेऊन नामजपही केला.
पंतप्रधान मोदींनी राम-सीता आणि लक्ष्मणाचंही दर्शन घेतलं.
पंतप्रधान मोदींनी वारकऱ्यांचा वेश परिधान केला होता. डोक्यावर वारकरी पगडी आणि कपाळावर अभीर-गोपीचंदाचा टिळा लावून धार्मिक वातावरणात मोदींनी विठुमाऊलीचं दर्शन घेतलं.
श्री संत तुकाराम महाराज संस्थान, देहू येथील प्रमुख नितीन मोरे यांनी सांगितलं की, 1 कोटी रुपये खर्च करून या ‘शिळा’मंदिराचं निर्माण केलं गेलं आहे. हा सर्व पैसा भक्तांनी दान दिला होता. मोरे म्हणाले, ‘आम्ही राज्य सरकारकडून कोणतंही अर्थसहाय्य घेतलं नव्हतं. मंदिर बांधण्यासाठी 6 वर्षे लागली.’ त्यांनी सांगितलं की मंदिरात एक शिळा असेल, ज्याला वंदन करून वारकरी संप्रदाय दरवर्षी वारीला सुरुवात करतील. दरवर्षी येथून वारी पंढरपूरला जाते.
संत तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिर लोकार्पणावेळी वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पंतप्रधान मोदींनी त्यांचीही भेट घेतली.
या वेळी, डोक्यावर तुळशी वृंदावन घेतलेल्या महिला वारकरीही मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
एक चिमुकला वारकरीही या कार्यक्रमादरम्यान पाहायाला मिळाला. वारकरी पगडी, सदरा, उपरणं, अभीर-गोपीचंदाचा टिळा, गळ्यात माळ असा वेश करत या छोट्या वारकऱ्यानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.
या चिमुकल्या वारकऱ्याबद्दल लोकांमध्ये कौतुक पाहायला मिळत होतं.
कार्यक्रमावेळी, पंतप्रधान मोदींना संत ज्ञानेश्वर माऊलींची प्रतिमा भेट देण्यात आली.
पंतप्रधान मोेदींनी उपस्थितांना हात जोडून नमस्कार केला. पंतप्रधान मोदी देहूमध्ये येण्याआधीच त्यांचा हा दौरा चर्चेचा विषय बनला आहे. कारण देहू येथील कार्यक्रमावेळी मोदींना देहू संस्थानकडून एक पगडी भेट दिली. यासाठी पुण्यातून खास पगडी बनवून घेण्यात आली होती.
कार्यक्रमावेळी, पंतप्रधान मोदींसह विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि चंद्रकांत पाटील उपस्थित होते.
कार्यक्रमावेळी भाषण करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं नाव घेतल्यामुळे नंतर वाद निर्माण झाला होता.
कार्यक्रमाला विविध समुदायांचे लोक उपस्थित होते.
अनेक साधूही या वेळी उपस्थित राहिले.