मीडिया रिपोर्ट्सनुसार, नाशिक जिल्ह्यातील हिरिदपाडा गावात जलसंकटामुळे अनेकांनी घरं सोडली आहेत. (सर्व फोटो - ANI)
एएनआयच्या वृत्तानुसार, पाण्याच्या संकटामुळे महिलांना पाणी आणण्यासाठी लांबचा प्रवास करावा लागतो आहे.
एएनआयशी बोलताना नाशिक जिल्ह्यातील हिरिदपाडा येथील रहिवाशांनी आपली समस्या सांगितली. ते म्हणाले की, गावात पाण्याचं भीषण संकट आहे. त्यामुळे बाहेरच्या गावातील लोकांना आपल्या मुलींची लग्न आमच्या गावात व्हावी, असं वाटत नाही. या समस्येमुळे अनेकांनी गाव सोडलं आहे.
नाशिक, नागपूरसह अनेक शहरांतील पाण्याचं संकट दिवसेंदिवस गंभीर होत आहे. नागपुरातील नारी परिसरात पिण्याच्या पाण्याअभावी नागरिकांना पाण्याच्या विहिरी आणि टँकरमधून पाणी भरावं लागत आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, 24 ते 27 मे दरम्यान मुंबई आणि उपनगरातील काही भागात पाणीटंचाई जाणवणार आहे. बीएमसीच्या म्हणण्यानुसार, या चार दिवसांत सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत पाणी येणार नाही.