छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक सोहळ्याला यंदा 350 वर्ष पूर्ण होत आहे.
6 जुन 1674 रोजी किल्ले रायगडावर सुवर्ण सिंहासन स्थापन करून शिवाजी महाराज छत्रपती झाले.
किल्ले रायगड नंतर हा नेत्रदीपक सोहळा नागपुरात साजरा केला जातो.
शिवराज्याभिषेक सोहळा समितीच्या वतीने दरवर्षी हा सोहळा मोठ्या थाटात संपन्न केला जातो.
शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने नागपुरात 3500 हजार दिव्यांचा दीपोत्सव साजरा करण्यात आला.
स्वराज्यासाठी कामी आलेल्या अनेक ज्ञात-अज्ञात मावळ्यांना दीपोत्सवाच्या माध्यमातून अभिवादन करण्यात आले.
नागपूरातील महाल भागात असलेल्या शिवतीर्थ येथे हा दीपोत्सव संपन्न झाला. या प्रसंगी भव्य अशी किल्ले रायगडची हुबेहुब प्रतिकृत्ती तयार करण्यात आली आहे.
कार्यक्रमाच्या सुरवातीला आई भवानीचा जागरण गोंधळ घालून देव देवतांना आवतनं देण्यात आलं.त्यानंतर मुख्य कार्यक्रमाचा सुरुवात करण्यात आली.
या कार्यक्रमाला शेकडोंच्या संख्येने शिवप्रेमी, नागपूरकर उपस्थित होते.