टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा त्याच्या आजवरच्या सर्वात कठीण कॅप्टनसी टेस्टसाठी सज्ज होत आहे.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील टेस्ट सीरिजला 9 फेब्रुवारीपासून नागपूरमध्ये सुरूवात होत आहे. रोहितच्या आयुष्यात नागपूर टेस्टला विशेष महत्त्व आहे.
रोहित शर्मा फेब्रुवारी 2010 साली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नागपूर टेस्टमध्ये पदार्पण करणार होता. पण अगदी शेवटच्या क्षणी झालेल्या दुखापतीमुळे त्याला बाहेर बसावं लागलं होतं. (फोटो : रोहित शर्मा इन्स्टाग्राम)
रोहित शर्माला मॅचपूर्वी वॉर्मअप दरम्या फुटबॉल खेळताना दुखापत झाली आणि त्याला टीममधून बाहेर व्हावं लागलं. रोहितच्या जागी वृद्धीमान साहाला पदार्पण करण्याची संधी मिळाली. (फोटो PTI)
रोहित शर्माला त्यानंतर टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण करण्यासाठी 3 वर्ष वाट पाहावी लागली.
रोहितनं 2013 साली वेस्ट इंडिज विरुद्धच्या सीरिजमध्ये दमदार पदार्पण केलं. त्या सीरिजमधील दोन्ही टेस्टमध्ये त्यानं सेंच्युरी झळकावली.
रोहित शर्मानं आजवर 45 टेस्टमध्ये 8 सेंच्युरी आणि 14 हाफ सेंच्युरीसह 3137 रन केले आहेत. (फोटो PTI)
रोहित शर्मा यापूर्वी 2017 साली श्रीलंकेविरुद्ध नागपूरमध्ये टेस्ट खेळला आहे. त्या टेस्टमध्ये त्यानं नाबाद 102 रनची खेळी केली होती. (फोटो BCCI)
आता 6 वर्षांनी रोहित पुन्हा एकदा नागपूरमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्धची टेस्ट मॅच खेळण्यासाठी सज्ज होत आहे. (फोटो BCCI)
टीम इंडियाला वर्ल्ड टेस्ट सीरिजची फायनल गाठण्यासाठी बॉर्डर - गावसकर ट्रॉफी चांगल्या फरकानं जिंकणे आवश्यक आहे. ही सीरिज जिंकण्यासाठी रोहितसह सीनिअर खेळाडूंवर मोठी जबाबदारी आहे. (फोटो - रॉयटर)