पुढील 4 दिवस राज्यात मेघगर्जनेसह मुसळधार ते हलक्या स्वरूपाचा पाऊस होईल.
मुंबईतही मुसळधार पाऊस हजेरी लावणारं असल्याची शक्यता वर्तवली आहे
22 जूनला मुंबईत मध्यम तर 23-24 जून रोजी मुसळधार पावसाची शक्यता आहे. भारतीय हवामानशास्त्र पुणे विभागाचे प्रमुख के एस होसळीकर यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
राज्यातील जवळपास सगळ्याच भागांमध्ये येत्या 3 दिवसात सरी बसरण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
23 आणि 24 जूनला विदर्भात मध्यम पावसाचा अंदाज आहे. तर, 24 जूनला कोकणातही मुसळधार पावसाची शक्यता आहे
तर, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात मात्र हलक्या सरींचा अंदाज आहे
पुण्यातही या काळात हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे