सोमवती अमावस्येला जेजुरी गडावर सोमवती यात्रा असते. परंपरेनुसार आज यात्रा भरली असून मोठ्या संख्येने भाविक सहभागी झाले आहेत.
महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबाचे दर्शन घेण्यासाठी राज्यभरातून भाविक गडावर येतात.
जेजुरी गडावर वर्षभरात अनेकवेळा यात्रा भरत असते, मात्र जेजुरीच्या सोमवती यात्रेला जास्त महत्त्व आहे.
सोमवती यात्रेच्यावेळी खंडोबाच्या उत्सव मूर्तीला कऱ्हा नदीत स्नान घातले जाते.
गडावर नेऊन मूर्तीची विधीवत पूजा केली जाते. या सोहळ्यात आणि नंतर गडावरील दर्शन सोहळ्यात मोठ्या संख्येने भाविक सहभागी होतात.
खांदेकरी आणि मानकरी खांद्यावर पालखी घेऊन नगर प्रदक्षिणेला जातात. भंडारा उधळत यळकोट यळकोट जय मल्हार या घोषणांनी गड दुमदुमून गेला.