राज्यात पुढचे 4-5 दिवस विदर्भात उष्ण लहरी ते तीव्र उष्ण लहरींची शक्यता आहे
यामुळे विदर्भात यलो आणि ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
अशात उकाड्याने आधीच हैराण झालेल्या नागरिकांना आता काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
दुसरीकडे मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
तर काही ठिकाणी ढगाळ आकाश राहील
भारतीय हवामान विभागाने याबाबतची माहिती दिली आहे.
शनिवारी पुण्यात काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी बरसल्या