रायगडमध्ये गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं असून, मोठी दुर्घटना समोर आली आहे.
खालापूर तालुक्यातील इर्सालवाडी या गावात ही दुर्घटना घडली आहे. या वाडीवर दरड कोसळली आहे. मोरबे धरणाच्या बाजूला असलेल्या या वस्तीवर दरड कोसळली.
50 ते 60 घरांची ही वस्ती आहे. ही घटना बुधवारी रात्री 11.30 ते 12 वाजेच्यादरम्यान घडली.
मुसळधार पाऊस पडत असताना घडलेल्या या घटनेत काही जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. तर, काही नागरिक सुखरूप वाचले आहेत.
अनेकजण अद्यापही ढिगाऱ्याखाली अडकल्यानं मृत्यूचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
60 पेक्षा अधिक लोक ढीगाऱ्याखाली अडकले असल्याची माहिती समोर येत आहे.
घटनेची माहिती मिळताच बचावपथक घटनास्थळी दाखल झालं आहे.