आज जागतिक चॉकलेट दिन आहे. दरवर्षी 7 जुलै रोजी साजरा केला जातो. चॉकलेट खायला चवदार तर असतंच पण ते शरीरासाठी अनेक प्रकारे फायदेशीरही आहे. ब्लड शुगर लेव्हल संतुलित ठेवण्याबरोबरच मेंदूचे कार्य देखील सुधारतं. हेच कारण आहे की आज लोकांच्या आवडत्या गोष्टींमध्ये याचा समावेश आहे.
मेंदूचे कार्य सुधारतं: एका अहवालानुसार डार्क चॉकलेट आपल्या मेंदूची कार्यक्षमता टिकवून ठेवण्यास आणि सुधारण्यास देखील उपयुक्त आहे.
ब्लड शुगर लेव्हल संतुलित ठेवतं :चॉकलेट खाल्ल्याने ब्लड शुगर लेव्हल संतुलित राहते जे आरोग्यासाठी चांगले आहे. डार्क चॉकलेटमध्ये असलेले पोषक घटक शरीरात ब्लड शुगर लेव्हल राखण्यास मदत करतात.
खूप पौष्टिक असतं: जर आपण डार्क चॉकलेट खात असाल तर ते खरंच खूप पौष्टिक असतं.
हृदयाला आजारांपासून दूर ठेवतं : डार्क चॉकलेट हृदयाला अनेक आजारांपासून दूर ठेवण्यास मदत करते. त्यात हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी गुण आहेत.
त्वचेसाठी देखील फायदेशीर आहे: डार्क चॉकलेटमधील बायोएक्टिव्ह संयुगे आपल्या त्वचेसाठी उत्तम आहे. त्यात सापडणारे फ्लाव्होनोल्स सूर्याच्या किरणांपासून संरक्षण करतात. रक्ताचा प्रवाहही सुधारतात व त्वचा चांगली ठेवतात.