नोकरी करणाऱ्या महिलांना स्वत:ची काळजी घेण्यासाठी वेळ देता येत नाही. विशेषत: जर त्यांच्या घरात लहान मुले असतील तर त्यांच्यासाठी वेळ काढणे अजूनच अवघड होते. यामुळे त्यांच्या आहार आणि दिनचर्याकडे दुर्लक्ष होते आणि मग दिवसभर थकवा आणि अशक्तपणाचा सामना करावा लागतो. मात्र आज आम्ही काही टिप्स देत आहोत ज्याद्वारे नोकरी करणारी महिला आपले आरोग्य उत्तम प्रकारे सांभाळू शकतात.
सक्रिय रहा : तुम्ही दररोज 15 मिनिटे चालत असाल तरी ते तुमची उर्जा पातळी वाढवण्याचे काम करते. म्हणूनच दिवसाची सुरुवात चालणे, जॉगिंग किंवा व्यायामाने करणे चांगले.
वजन कमी करा : जर तुमचे वजन वाढले असेल तर तुम्हाला लवकर थकवा जाणवत असेल. त्यामुळे वजन कमी करण्याचा प्रयत्न करा. वजन कमी केल्यावर तुम्हाला अधिक उर्जेने भरलेले जाणवेल.
चांगली झोप आवश्यक : रात्री चांगली झोप घ्या आणि दररोज त्याच वेळी उठण्याचा प्रयत्न करा. दिवसा झोपणे टाळले तर बरे होईल. रात्री झोपण्यापूर्वी थोडा आराम करण्याचा प्रयत्न करा.
तणाव कमी करा : ताण हा आपल्या आयुष्याचा एक भाग आहे, तो कमी करता येत नाही पण त्याचा प्रभाव तुम्ही कमी करू शकता. म्हणूनच तुम्ही काही गोष्टी करू शकता. जसे की, मित्रांसोबत वेळ घालवणे, योगासनं करणे, गाणी ऐकणे आणि काहीतरी चांगलं वाचणे.
कॅफिनपासून अंतर ठेवा : जर तुम्ही महिनाभर कॅफिनयुक्त पदार्थांपासून अंतर राखले तर तुम्हाला कमी थकवा जाणवेल. यासाठी चहा, कॉफी, कोक इत्यादींचे सेवन कमी केल्यास चांगले होईल.
हायड्रेटेड राहा : कमी पाणी प्यायल्याने कमी वेळा तुम्हाला थकवा आणि चक्कर येते. म्हणूनच तुम्ही स्वतःला सतत हायड्रेटेड ठेवले पाहिजे आणि अल्कोहोल इत्यादीपासून दूर राहणे चांगले होईल.