मराठी बातम्या » फोटोगॅलरी » लाइफस्टाइल » 'या' ठिकाणी महिला, आई होणं तर सोडाच लग्नालाही देत आहेत नकार! हे आहे कारण
News18 Lokmat | March 29, 2023, 15:27 IST | Mumbai, India

'या' ठिकाणी महिला, आई होणं तर सोडाच लग्नालाही देत आहेत नकार! हे आहे कारण

आई होणं हा महिलांच्या आयुष्यातील खूप सुखद आणि आनंदी क्षण मानला जातो. मात्र तुम्हाला माहितीये या देशात महिला आई होण्यास पूर्णपणे नकार देत आहेत. त्यासाठी महिला लग्नही करत नाहीत. जाणून घ्या यामागचे कारण.

लग्नानंतर महिलांच्या जबाबदाऱ्या खूप वाढतात आणि आई झाल्यानंतर या जबाबदाऱ्यांमध्ये खूपच वाढ होते. म्हणूनच सध्या जगभरात मॅरेज स्ट्राईक ही संकल्पना खूप प्रसिद्ध होतेय.
1/ 8

लग्नानंतर महिलांच्या जबाबदाऱ्या खूप वाढतात आणि आई झाल्यानंतर या जबाबदाऱ्यांमध्ये खूपच वाढ होते. म्हणूनच सध्या जगभरात मॅरेज स्ट्राईक ही संकल्पना खूप प्रसिद्ध होतेय.

2/ 8

या संकल्पनेनुसार महिला लग्नास नकार देत आहेत. त्यामुळे चीन, जपान, दक्षिण कोरिया सारख्या देशांमध्ये मुलांच्या जन्माची संख्या कमी झाली आणि वृद्धांची संख्या खूप वाढली आहे.

3/ 8

लोकमतच्या वृत्तानुसार, दक्षिण कोरियामध्ये याचा सर्वाधिक प्रभाव दिसतो आहे. ज्या शाळेमध्ये 700 मुले असायची त्या शाळेत आता केवळ 4 मूळ दिसतात. इथे शाळांचे रूपांतर रुग्णालयात झाले आहे.

4/ 8

जपानमध्येही बहुतांश महिला आई होण्यास नकार देत असल्यामुळे बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. इथे महिलेला लग्नासाठी 4.5 लाख रुपये द्यावे लागतात तर आई होण्यासाठी 3 लाख रुपये.

5/ 8

महिला आई होण्यास नकार देतात यामध्ये अनेक कारण आहेत. यातील सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे बाळाच्या जन्मानंतर महिलांच्या जबाबदाऱ्या वाढतात. त्यांना आपली नोकरी सोडून द्यावी लागते.

6/ 8

अजून एक कारण म्हणजे नोकरी असतानाही महिलांना पुरुषांच्या तुलनेत घरामध्ये जास्त काम करावे लागते. तसेच गर्भांधारणेदरम्यान महिलांना नोकरीवरूनही काढले जाते.

7/ 8

वृद्धांच्या वाढत्या आकड्यावर बोलताना येत विद्यापीठातील प्राध्यापक युसुके नारिता म्हणाले, 'यावर सोपा उपाय म्हणजे वृद्धांनी सामूहिक आत्महत्या करावी.' यासाठी त्यांनी 19 व्या शतकातील 'सेप्पुकु' प्रथेचे उदाहरण दिले.

8/ 8

सेप्पुकु या प्रथेनुसार, जपानमधील सामुराई समाजातील लोक काही महत्त्वाचे अवयव काढून टाकून आपल्या प्रमाणाचा त्याग करायचे.

Published by:Pooja Jagtap
First published:March 29, 2023, 15:27 IST

ताज्या बातम्या

सुपरहिट बॉक्स