NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / लाइफस्टाइल / Winter Health Tips : जादूसारखे काम करतील हे 5 तेल, सांधेदुखीची समस्या चुटकीसरशी होईल दूर

Winter Health Tips : जादूसारखे काम करतील हे 5 तेल, सांधेदुखीची समस्या चुटकीसरशी होईल दूर

हिवाळ्यात उद्भवणाऱ्या सांधेदुकीच्या समस्येमुळे अनेक जण त्रस्त आहेत. या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी काही तेल खूप प्रभावी ठरतात. कोणते आहेत ते तेल आणि त्याचे फायदे काय आहेत हे जाणून घेऊया.

18

हिवाळ्यात अनेकांना सांधेदुखीचा त्रास सुरू होतो. त्यामुळे यापासून आराम मिळवण्यासाठी प्रभावी उपाय आज आपण या लेखातून जाणून घेणार आहोत.

28

हिवाळ्यात होणाऱ्या सांधेदुखीच्या त्रासामागे अनेक कारणे असतात. पुरेशा प्रमाणात सकस आहार न घेणे, जंक फूडचा अतिवार, डेस्कवर तासंतास बसून काम करणे यामुळे ही समस्या उद्भवते.

38

तुम्हालाही सांधेदुखीचा त्रास होत असेल तर काही तेल तुमच्यासाठी अतिशय फायदेशीर ठरू शकतात. येथे आम्ही तुम्हाला पाच 5 आयुर्वेदिक तेलांविषयी माहिती देत आहोत. यांचा वापर करून तुम्ही सांधेदुखीच्या समस्येपासून आराम मिळवू शकता.

48

बदाम तेल : बदामाच्या तेलात व्हिटॅमिन ई असते. त्यामुळे या तेलाने मालिश केल्यास हाडं मजबूत होतात. बदामाच्या तेलाने मालिश करण्यासाठी ते कोमट करून सांध्यांना मसाज करा. तुम्हाला खूप आराम मिळेल.

58

तिळाचे तेल : तिळाच्या तेलात इतर तेलांपेक्षा जास्त मॉइश्चरायझर असते. यात ओमेगा-3 फॅटी अॅसिड, कॉपर, झिंक, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम हे घटक आढळतात. सांधेदुखीत या तेलाने मसाज केल्यास आराम मिळतो.

68

नारळाचं तेल : हिवाळ्यात सांधेदुखीपासून आराम मिळवण्यासाठी खोबरेल तेल उत्तम मानले जाते. खोबरेल तेलात अँटी-इंफ्लामेंटरी आणि वेदनाशामक गुणधर्म असतात. या तेलाने मसाज केल्याने सांधेदूखीपासून आराम मिळतो.

78

ऑलिव तेल : ऑलिव्ह ऑईलने सांध्यांची मसाज केल्यास रक्ताभिसरण सुधारते आणि सांधेदुखीपासून आराम मिळतो. रात्री झोपताना या तेलाने मालिश करावी.

88

मोहरीचे तेल : मोहरीच्या तेलाने सूज किंवा कोणत्याही वेदनांमध्ये खूप आराम मिळतो. यासाठी 2 ते 3 चमचे मोहरीच्या तेलात लसणाच्या 2 पाकळ्या टाका आणि ते थोडे गरम करा. थंड झाल्यावर सांधे आणि पायांवर मसाज करा.

  • FIRST PUBLISHED :