NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / लाइफस्टाइल / Winter Health Tips : आरोग्याच्या प्रत्येक समस्येवर रामबाण उपाय आहेत कारले, हिवाळ्यात नक्की खा

Winter Health Tips : आरोग्याच्या प्रत्येक समस्येवर रामबाण उपाय आहेत कारले, हिवाळ्यात नक्की खा

कारल्याचे सेवन आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. मात्र हिवाळ्यात कारल्याचे सेवन आवर्जून केले पाहिजे. हिवाळ्यात कारलं खाल्याने आपल्या त्वचेसह आरोग्याच्या अनेक संस्त्यांपासून सुटका होते.

18

केवळ कारलंच नाही, तर कारल्याच्या बिया, मुळे आणि पानेही आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. त्यामुळे तुमच्या आहारात या भाजीचा समावेश नक्की करा. वाचा कारल्याचे आरोग्य फायदे.

28

कारल्यामध्ये भरपूर जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. त्यात लोह, मॅग्नेशियम, पोटॅशियम, व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी असते जे आरोग्यासाठी चांगले असते.

38

कारलं सर्दी, खोकला आणि दमा यांसारख्या श्वसनाच्या समस्या दूर करतो. त्याचबरोबर कारल्याचे सेवन रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठीही उपयुक्त असते.

48

हिवाळ्यात त्वचा आणि निस्तेज दिसू शकते. कारल्यामध्ये अनेक आवश्यक अँटीऑक्सिडंट आढळतात, जे त्वचेचे वृद्धत्व रोखतात. नियमित कारलं खाल्याने मुरुम, पिंपल्स आणि सुरकुत्या दूर होतात.

58

बीपी नियंत्रणात ठेवण्यासाठी कारले उपयुक्त आहे. हे खराब कोलेस्टेरॉल कमी करते. हृदयरोग, कर्करोग, बद्धकोष्ठता, यकृत आणि किडनीच्या समस्यांसाठी देखील कारले एक चांगला आहार आहे.

68

कारले मधुमेहींसाठी फायदेशीर असतात. हे शरीरातील इन्सुलिनची पातळी राखते. यामुळे साखरेची पातळी नियंत्रणात राहते.

78

नियमित कारल्याचा रस प्यायल्याने रक्तातील अनावश्यक घटक शरीरातून बाहेर पडतात आणि शरीर पूर्णपणे डिटॉक्स होते. तसेच शरीरातील लोहाची कमतरताही पूर्ण करते.

88

ज्यांना वजन कमी करायचे आहे, त्यांनी कारल्याचे नियमित सेवन केल्यास चरबी वितळवण्यास मदत होईल. त्यामुळे शरीराचा वाढता लठ्ठपणा कमी होतो पचनक्रियादेखील सुधारते.

  • FIRST PUBLISHED :