झी न्यूज हिंदीमध्ये दिलेल्या माहितीनुसार, रंगाचा माणसाच्या व्यक्तिमत्वावर खूप परिणाम होत असतो. पांढरा रंग शांतता, पवित्रता आणि शिक्षणाचे प्रतीक मानला जातो. यामुळे मनाला शांतता देखील मिळते.
हिंदू धर्मानुसार, विद्येची देवी सरस्वतीचा पोशाखही पांढरा असतो. तसेच काही मान्यतांनुसार शोक व्यक्त करण्यासाठीही पांढरे कपडे घातले जातात. मात्र त्यामुळे असा प्रश्न पडतो की, पांढरे कपडे शोकासाठी वापरले जात असतील तर भारतातील नेते नेहमी पांढरे कपडे का घालतात?
स्वातंत्र्य चळवळीत महात्मा गांधीजींनी स्वदेशीचा नारा दिला, तेव्हा लोकांनी विदेशी कपड्यांची होळी केली. महात्मा गांधींनी देशवासियांना चरखाच्या साहाय्याने बनवलेले खादीचे कपडे घालण्याची प्रेरणा दिली, कारण बापूंनी ते स्वावलंबनाचे प्रतीक मानले.
खादीपासून बनवलेले हे कपडे बहुतेक पांढऱ्या रंगाचे होते. त्यामुळे त्यावेळी स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झालेल्या क्रांतिकारकांनी ते अंगीकारले. कालांतराने हा रंग नेत्यांची ओळख बनला. तेव्हापासून राजकारणी फक्त पांढऱ्या रंगाच्या कपड्यातच दिसतात.
पांढरा रंग सत्य आणि अहिंसेचेही प्रतीक मानला जातो. पारंपरिक पोशाख जसे की, कुर्ता, पायजमा, धोती, टोपी, सूट आणि साडी हे पांढऱ्या रंगामध्ये खूप आकर्षक दिसतात. पांढरा रंग तुमच्यातील साधेपणा दर्शवतो.
पांढऱ्या रंगातून नेतृत्वाची जाणीव निर्माण होते. पांढऱ्या रंगाच्या कपड्यांमध्ये कोणतंही लहान-मोठा, कमी-जास्त असा फरक दिसत नाही. कुठेतरी फरक जाणवू देत नाही. यामुळेच भारतीय नेते आणि बहुतांश समाजसेवक पांढरे कपडे घालतात.