प्रक्रिया केलेल्या साखरेच्या जास्त वापरामुळे दीर्घकालीन आरोग्य समस्या आणि मधुमेह प्रकार 1 आणि 2, साखर, हृदयरोग, कर्करोग आणि मूत्रपिंड/यकृत समस्या यासारखे आजार होऊ शकतात.
आज आम्ही तुम्हाला पांढऱ्या साखरेसाठी काही निरोगी पर्याय पाहणार आहोत. जे तुमचे अन्न केवळ चवदार बनवत नाहीत तर त्यांचे अनेक आरोग्य फायदे देखील आहेत.
स्टारफुल : स्टारफुलाची चव थोडी गोड आणि तिखट असते. साखरेऐवजी हा एक आरोग्यदायी पर्याय ठरू शकतो. स्टारफुल अँटिऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे ए आणि सी समृद्ध आहे, जे वृद्धत्व आणि मधुमेहासाठी जबाबदार असलेल्या मुक्त रॅडिकल्सशी लढण्यास मदत करतात.
मध : मधदेखील साखरेला असलेल्या चांगल्या पर्यायांपैकी एक आहे. त्याचे आरोग्य फायदे आहेत. मध अँटिऑक्सिडंट्समध्ये समृद्ध आहे आणि रक्तातील साखरेची पातळी सुधारते, रक्तदाब कमी करते आणि हृदयाचे ठोके नियंत्रित करते.
व्हॅनिला : साखरेऐवजी तुम्ही ताजे व्हॅनिला अर्क, व्हॅनिला बीन पेस्ट किंवा पावडर वापरू शकता. यामध्ये नियासिन, थायामिन, व्हिटॅमिन-बी6 आणि पॅन्टोथेनिक ऍसिड सारख्या बी-व्हिटॅमिन आहेत, जे निरोगी त्वचेसाठी महत्वपूर्ण ठरतात.
ब्राऊन शुगर : ब्राऊन शुगरदेखील उसापासून बनवली जाते. मात्र पांढऱ्या साखरेपेक्षा ब्राऊन शुगर हेल्दी मनाली जाते. ब्राऊन शुगर पचनासाठी चांगली आहे. तसेच ती पीरियड क्रॅम्प्स आणि दम्यामध्येदेखील मदत करते.
नारळ : चहा किंवा कॉफीमध्ये साखरेऐवजी नारळाचे दूध किंवा मलई घातल्यास तेही गोड चव देते. नारळाच्या दुधामध्ये मॅंगनीज आणि तांबे असे महत्वाचे पोषक घटक असतात, जे तुमच्या हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले ठरू शकतात.
गूळ : पांढऱ्या साखरेसाठी गूळ हा एक उत्तम पर्याय आहे, कारण आरोग्यासाठी त्याचे फायदे अनंत आहेत. हे श्वासोच्छवासाच्या समस्यांना प्रतिबंधित करते, रक्तदाब वाढण्यास मदत करते, वजन कमी करण्यास मदत करते. मात्र गुळाचे संबंधी प्रमाणातच केले गेले पाहिजे.
डेट्स : डेट्स म्हणजेच खजूर साखरेचा उत्तम पर्याय आहेत. याची चव गोड असून यामध्ये पोषक, फायबर आणि अँटिऑक्सिडंट्स असतात, ज्यामुळे खजूर खीर वगैरे सारख्या पदार्थांमध्ये वापरले जाऊ शकतात.
वेलची : वेलचीची चव अनेक लोकांना खूप आवडते. वेलची थोडी गोडही असते. वेलचीमध्ये अँटिऑक्सिडंट, अँटी-इंफ्लेमेटरी आणि हायपोलिपिडेमिक गुणधर्म असतात, जे रक्तातील साखर नियंत्रित करण्यास मदत करतात.