NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / लाइफस्टाइल / वेट लॉसपासून दम्यापर्यंतच्या त्रासांवर फायदेशीर आहे पांढरा भोपळा, वाचा अद्भुत फायदे

वेट लॉसपासून दम्यापर्यंतच्या त्रासांवर फायदेशीर आहे पांढरा भोपळा, वाचा अद्भुत फायदे

भोपळ्यामधे फायबर, अनेक प्रकारचे पोषक घटक असतात, जे चयापचय वाढवतात. यासोबतच आरोग्यालाही अनेक फायदे आहेत. चला जाणून घेऊया पांढऱ्या भोपळ्याचे फायदे काय आहेत.

16

पांढऱ्या भोपळ्यामध्ये पोटॅशियम, कॅल्शियम सारखी अनेक खनिजे आणि व्हिटॅमिन ए, सी, ई सारखी जीवनसत्त्वे असतात. याव्यतिरिक्त, ते अँटीऑक्सिडंट्समध्ये देखील समृद्ध आहे.

26

वजन कमी करण्यासाठी लोक अनेक प्रकारचे वजन कमी करणारे ज्यूस पितात. जर तुम्ही लठ्ठपणा कमी करण्यासाठी अनेक प्रकारचे ज्यूस वापरून पाहिले असतील तर आता पांढऱ्या भोपळ्याचा रस ट्राय करू शकता.

36

दम्याचा त्रास असलेल्यांनी आहारात पांढऱ्या भोपळ्याचा समावेश करावा. कारण यामध्ये अँटी-ऑक्सिडंट्स असतात, जे श्वसन प्रणालीतील संसर्ग कमी करण्यास फायदेशीर ठरतात.

46

पांढरा भोपळा तुमची दृष्टी सुधारण्यासही मदत करतो. कारण भोपळ्यामधे व्हिटॅमिन ए मुबलक प्रमाणात आढळते. ज्या लोकांना रातांधळेपणा आहे त्यांच्यासाठी हे फायदेशीर आहे.

56

सांधेदुखीच्या त्रासावरही पांढरा भोपळा फायदेशीर आहे. सांधेदुखीचा त्रास कमी करण्यासाठी रोज सकाळी एक ग्लास भोपळ्याचा रस प्या. यामुळे काही काळातच सांधेदुखीपासून आराम मिळेल.

66

रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठीही पांढरा भोपळा खूप फायदेशीर आहे. बदलत्या ऋतूमध्ये सर्दी, खोकला यांसारख्या समस्या टाळण्यासाठी पांढऱ्या भोपळ्याचे सेवन करणे फायद्याचे ठरते.

  • FIRST PUBLISHED :