NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / लाइफस्टाइल / Vastu Tips : जेवणासाठी कोणती दिशा असते योग्य आणि कोणत्या दिशेला जेवण करणे टाळावे?

Vastu Tips : जेवणासाठी कोणती दिशा असते योग्य आणि कोणत्या दिशेला जेवण करणे टाळावे?

वास्तुशास्त्रामध्ये (Vastu Shastra) आपल्या दैनंदिन जीवनाशी निगडित कार्यांबाबत अनेक सूचना देण्यात आल्या आहेत, ज्याचा अवलंब करून संतुलित आणि यशस्वी जीवन जगता येते. वास्तूशस्त्रामध्ये दिशांचे तपशीलवार वर्णन केलेले आहे. ज्यामध्ये त्या दिशा देव आणि उर्जेशी संबंधित आहेत. आज आम्ही तुम्हाला कोणती दिशा जेवणासाठी योग्य आहे (Right Direction For Eating) याबद्दल माहिती देणार आहोत.

15

पूर्व दिशा (East) : वास्तुशास्त्रानुसार, जेव्हा तुम्ही पूर्व दिशेला तोंड करून जेवता. तेव्हा तुमच्या मेंदूला उर्जा मिळते आणि पचन चांगले होते. कमकुवत पचनक्रिया पचन ही सर्व समस्यांचे मूळ कारण आहे. म्हणून पूर्व दिशेला बसूनच जेवण करावे. ज्यांची पचनशक्ती कमजोर आहे त्यांच्यासाठी पूर्व दिशा उत्तम आहे.

25

पश्चिम दिशा (West) : पश्चिम दिशा ही लाभाची दिशा मानली जाते. त्यामुळे ही अन्न ग्रहण करण्यासाठीही चांगली दिशा आहे. वास्तुशास्त्रानुसार व्यवसाय, नोकरी किंवा लेखन, संशोधन आणि शिक्षण क्षेत्रातील व्यावसायिकांसाठी ही दिशा चांगली मानली जाते. वास्तू म्हणते की जेव्हा तुम्ही पश्चिम दिशेला तोंड करून जेवता तेव्हा ती तुमच्या फायद्याची शक्यता वाढवू शकते.

35

उत्तर दिशा (North) : ही दिशा ज्ञान आणि आर्थिक संपन्नता शोधणाऱ्यांसाठी अनुकूल आहे. विद्यार्थी आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करणार्‍या लोकांसाठी उत्तर दिशेत बसून भोजन करणे फायदेशीर ठरते. जे लोक करिअरच्या सुरुवातीच्या टप्प्यात आहेत त्यांच्यासाठी ही दिशा योग्य आहे.

45

दक्षिण दिशा (South) : जेवणासाठी ही दिशा सर्वात वाईट आहे. मृत लोकांसाठी दक्षिण दिशा आहे आणि म्हणून वास्तुशास्त्र या दिशेला बसून खाणे टाळण्याचे सुचवते. ही यमाची दिशा आहे. विशेषत: ज्यांचे आई-वडील हयात असतील. त्यांनी या दिशेला बसून कधीही जेवण करू नये.

55

ई टाइम्सने दिलेल्या माहितीनुसार, वास्तुशास्त्रामध्ये असे सांगितले गेले आहे की, जेवणाची खोली नेहमी घराच्या पश्चिम दिशेला असावी. ही दिशा शुभ आणि लाभदायक मानली जाते आणि जेव्हा लोक या दिशेला जेवतात तेव्हा आरोग्य चांगले राहते आणि अन्न आणि इतर मौल्यवान वस्तूंची कमतरता भासत नाही.

  • FIRST PUBLISHED :