जर तुम्ही नियमित व्यायाम आणि आहार योजनेचे पालन करू शकत नसाल तर वजन कमी करण्यासाठी तुम्ही झोपण्याच्या तंत्रावर अवलंबून राहू शकता. चला तर मग जाणून घेऊया झोपेदरम्यान काय केल्याने तुमचे वजन कमी होऊ शकते.
झोपण्याची वेळ ठरवा : जर तुम्ही दररोज ठराविक वेळी झोपण्याचा नित्यक्रम पाळला तर तुमच्या शरीराला त्याच वेळी झोपण्याची सवय लागेल. दिवसभराच्या थकव्यानंतर झोपायला गेल्यास लगेच झोप लागते आणि 7 ते 8 तासांची गाढ झोप वजन कमी करण्यास मदत करते.
झोपण्यापूर्वी हे पदार्थ टाळा : रात्रीचे हलके जेवण करा. कॅफिनयुक्त पदार्थांचे सेवन करू नका. हलके अन्न खाल्ल्याने पचनक्रिया वाढते आणि झोपताना कॅलरीज बर्न होतात. झोपण्यापूर्वी चहा-कॉफी पिऊ नका.
झोपेसाठी योग्य वातावरण : झोपताना खोलीत कमीत कमी प्रकाश असावा. कारण तेजस्वी प्रकाश झोपेत अडथळा आणू शकतो. आरामदायी मॅट्रेस निवडा आणि झोपण्यासाठी स्वच्छ चादर वापरा.
जेवणानंतर काही वेळाने झोप : रात्रीचे जेवण करून लगेच झोपायला गेल्यास तुमची पचनक्रिया व्यवस्थित होत नाही. तज्ज्ञांनी नेहमी झोपायच्या किमान 2 ते 3 तास आधी जेवण्याचा सल्ला दिला आहे.
ब्लँकेटशिवाय झोपा : थंड तापमानात झोपल्याने पचनक्रिया वाढण्याची शक्यता असते. ज्यामुळे अधिक कॅलरी जाळण्यास मदत होते. संशोधनानुसार, खोलीचे तापमान कमी केल्याने चांगले ब्राऊन फॅट वाढते. ज्यामुळे रक्तातील साखरेपासून मुक्ती मिळते आणि कॅलरीज बर्न होतात.