आपल्याकडे UPIचा वापर खूप जास्त वाढला आहे. लहानांपासून ते अगदी मोठ्या पेमेंटसाठी लोक UPIचा वापर करतात.
UPI मुळे कधीही आणि कुठूनही पैसे पाठवणं सोप्पं होतं, शिवाय हिशोब ठेवणं देखील सोप्पं होतं. पण अनेकांना असा प्रश्न पडतो की, ते दिवसाला किती पैसे पाठवू शकतात किंवा UPI ने पेमेंट करु शकतात?
नॅशनल पेमेंट कॉरपोरेशन ऑफ इंडियाने UPI द्वारे माहिती देण्यात आली आहे की, तुम्ही UPIने एका दिवसात जास्तीत जास्त एक लाख रुपये ट्रांसफर करु शकता. ही तुमची जास्तीची लिमिट आहे. ज्यामुळे यापेक्षा जास्त पैसे तुम्ही कोणालाही पाठवू शकत नाही.
तुम्ही वेगवेगळं पेमेंट केलं तरी देखील त्याची बेरीज दिवसाला एका लाखापेक्षा वर जाऊ नये.
असं असलं तरी देखील अनेक ऍप्सने आपली-आपली ट्रॅझॅक्शन लिमिट सेट केली आहे. ज्यामध्ये पेटीएम एका तासात 20 हजार रुपये ट्रांसफर करण्याची अनुमती देते.
तेच फोन पे या ऍप्सबद्दल बोलायचं झालं तर युजर्स दिवसभरातून कधीही 1 लाख रुपये पाठवू शकतात.
ऍमेझॉन आणि गुगुल पे वरुन देखील तुम्ही 1 लाखापेक्षा जास्त रक्कम तुम्ही पाठवू शकत नाही, शिवाय तुम्ही दिवसभरात ती कधीही पाठवू शकता.