पंचांगानुसार यंदा 5 नोव्हेंबर (शनिवार) पासून तुळशी विवाहाला प्रारंभ होणार आहे. 5 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 06.08 वाजता द्वादशी तिथी सुरू होईल. (Photo Credit : creative_artist2022)
द्वादशी तिथी 6 नोव्हेंबर (रविवार) संध्याकाळी 05:06 मिनिटांपर्यंत राहील. तुळशी विवाहाचा शुभ मुहूर्त 6 नोव्हेंबरला दुपारी 01:09 ते 03:18 पर्यंत राहील. (Photo Credit : creative_artist2022)
या दिवसापासून लोक सर्व शुभ कार्यांना सुरुवात करू शकतात. तुळशी विवाह केल्याने वैवाहिक जीवनात आनंद मिळतो असे मानले जाते. तुळशी विवाह कसा करावा हे जाणून घेऊया. (Photo Credit : art._.by._.heart_98)
तुळशीविवाह करताना तुळशीचे रोप उघड्यावर म्हणजेच गच्चीवर किंवा अंगणात ठेवा. तुळशी विवाहाचा मंडप उसाने सजवा. (Photo Credit : bhagyashree_dusane_2000)
सर्वप्रथम कलश आणि गौरी गणेशाची पूजा करावी. यानंतर माता तुळशीला आणि भगवान शालिग्रामला धूप, दिवा, वस्त्र, माळा, फुले अर्पण करा. (Photo Credit : nehasrangoli)
तुळशी विवाहाचे विधी सुरू करण्यापूर्वी तुळशीच्या रोपावर लाल रंगाची ओढणी टाका. आता भगवान विष्णूचे दुसरे रूप शालिग्राम तुळशीच्या कुंडीत ठेवून त्यांना तीळ अर्पण करा. (Photo Credit : rangolibypaddy)
यानंतर दुधात हळद टाकून तुळस आणि शालिग्राम यांना अर्पण करा. तुळशी विवाहाच्या वेळी मंगलाष्टकांचे पठण करा. (Photo Credit : payal_yearmwar)
तुळशी आणि शालिग्राम विवाहाच्या वेळी तुळशीची प्रदक्षिणा करा. आता तुळशीविवाहाचा प्रसाद भोजनासोबत खा. (Photo Credit : priya_shinde_2526)
पूजा संपल्यावर घरातील सर्व सदस्यांनी श्रीविष्णूला झोपेतून उठवण्यासाठी शालीग्रामच्या रूपात त्यांची पूजा करावी. (Photo Credit : rsp1571)