प्रवास रात्रीचा असो की दिवसाचा, मात्र यादरम्यान कायम घरच्यांच्याकिंवा एखाद्या जवळच्या व्यक्तीच्या संपर्कांत राहा. विशेषतः ऑटोरिक्षा, टॅक्सी अशा वाहनांमधून एकट्याने प्रवास करताना काळजी घ्या.
प्रवासादरम्यान नेहमी चेहऱ्यावर आत्मविश्वास ठेवा. लोकांना तुम्ही एकट्या आहात किंवा तुम्ही घाबरलेल्या, अस्वस्थ आहात हे दिसू देऊ नका. त्याचप्रमाणे प्रवासात नेहमी सजग म्हणजेच अलर्ट रहा. आजूबाजूच्या माणसांचे, परिस्थितीचे निरीक्षण करा.
प्रवासादरम्यान आपली बॅग आपल्या जवळच ठेवा. शक्यतो आपल्याला प्रवासात जे काही अन्न, पाणी लागणार आहे ते आपल्या घरूनच आणा किंवा एखाद्या चांगल्या वेदरकडून खरेदी करा.
प्रवासादरम्यान काही आपटककालीन परिस्थिती निर्माण झाली तर अशावेळी वाहनातून बाहेर पडण्याचा कोणता मार्ग असतो. हे तुम्हाला माहित असावे. म्हणून आपण ज्या वाहनातून जात आहोत त्याबद्दल आपल्याला माहिती असावी.
प्रवासादरम्यान शेजारी बसलेल्या व्यक्तीशी बोला. ती व्यक्ती बोलण्यायोग्य आहे की नाही याचा प्रवासादम्यान शेजारच्या व्यक्तीशी ओळख झाल्या आपत्कालीन परिस्थितीत ही व्यक्ती तुमची मदत करू शकते.
जास्त लांबचा प्रवास करत असाल तर शक्यतो रेल्वेचा प्रवास निवडा. तुम्हाला ज्या ठिकाणी जायचे आहे तिथे रेल्वे जात नसेल तर शक्यतो दिवस प्रवास करा किंवा तुम्ही रात्रीचाच प्रवास करू इच्छित असाल तर प्रवासात अलर्ट राहा.