NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / लाइफस्टाइल / 'या' ट्रिक्सने उन्हाळ्यात वापरा AC आणि वीज बिलाचं टेन्शन विसरुन जा

'या' ट्रिक्सने उन्हाळ्यात वापरा AC आणि वीज बिलाचं टेन्शन विसरुन जा

उन्हाळा इतका वाढला आहे की आता लोकांना एसीची सर्वात जास्त गरज भासू लागली आहे. पण असं असलं तरी देखील एसीला सर्वात जास्त बिल येतं, ज्यामुळे बहुतांश लोक एसी असून देखील एसी लावत नाहीत किंवा मग फार कमी वेळेला एसीचा वापर करतात. पण आता काळजी करु नका आम्ही काही अशा ट्रिक्स सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्ही एसी देखील वापरु शकाल शिवाय बिल देखील कमी येईल.

15

ब्युरो ऑफ एनर्जी इफिशियन्सी (बीईई) नुसार, मानवी शरीरासाठी आदर्श तापमान 24 अंश आहे. यासोबतच अनेक अभ्यास असेही सांगतात की तापमान फक्त 1 डिग्रीने वाढवल्यास 6 टक्क्यांपर्यंत विजेची बचत होऊ शकते. म्हणजेच, शरीर आणि वीज बिल दोन्हीसाठी उच्च तापमानात एसी चालवणे चांगले. त्यामुळे एसी 18 अंश न ठेवता 24 अंश ठेवा.

25

एसी सर्व्हिसिंग आवश्यक: जर तुम्ही सीझनमध्ये पहिल्यांदाच एसी चालवणार असाल. तर सर्व्हिसिंगशिवाय एसी चालवू नका. इनडोअर आणि आउटडोअर युनिट्सची सर्व्हिसिंग आवश्यक आहे. कारण, जर सर्व्हिसिंग नसेल, तर एसीमध्ये खूप घाण असते, ज्यामुळे एसी सुरळीत चालू होत नाही आणि त्यामुळे विजेचा वापरही वाढतो.

35

इको आणि स्लीप मोड्स वापरा: एसी विशेषत: रात्री झोपताना घरांमध्ये सतत चालतो. अशा स्थितीत अनेक एसीमध्ये स्लीप मोड आणि इकॉनॉमी मोड उपलब्ध आहेत. त्यांचा वापर करून तुम्ही वीज वाचवू शकता.

45

एसीसोबत पंखा वापरा: एसीमधून बाहेर पडणारी थंड हवा खोलीच्या प्रत्येक कोपऱ्यात पसरवण्यासाठी पंखा उत्तम प्रकारे काम करतो. अशा परिस्थितीत एसीच्या कामाचा ताणही कमी असतो. यामुळे विजेचीही बचत होते. तसेच, खोलीच्या खिडक्या आणि दरवाजे बंद असावेत.

55

एनर्जी एफिशियंट एसी खरेदी करा: जर तुम्हाला एसी चालवायचा असेल आणि वीज वाचवायची असेल तर. तर 3 किंवा 5 स्टार रेटिंग असलेला एसी खरेदी करणे चांगले. तसेच खरेदी करता येत असेल तर इन्व्हर्टर एसी घ्या. कारण, ते विजेची खूप बचत करतात.

  • FIRST PUBLISHED :