NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / लाइफस्टाइल / Healthy Hair Tips : या 10 टिप्स तुमचे केस वाढवतील आणि मजबूतही करतील! एकदा नक्की ट्राय करा

Healthy Hair Tips : या 10 टिप्स तुमचे केस वाढवतील आणि मजबूतही करतील! एकदा नक्की ट्राय करा

Hair Growth tips in marathi : केसगळती थांबवण्यासाठी केवळ घरगुती उपाय करणे, केसांवर वेगवेगळे पदार्थ लावणे एवढेच आवश्यक नसते. केसांची योग्यप्रकारे काळजी घेणेदेखील केसगळती थांबवण्याचा उत्तम पर्यंत असतो.

18

केसांना संपूर्ण पोषण देण्यासाठी आणि रक्तप्रवाह वाढवण्यासाठी केसांवर अत्यावश्यक तेल वापरा. यामध्ये रोझमेरी, लॅव्हेंडर, पेपरमिंट, सीडरवुड, थायम ही काही आवश्यक तेले म्हणजेच इसेन्शियल ऑइल आहेत.

28

उष्णतेने केसांचा नैसर्गिक ओलावा निघतो, ज्यामुळे ते ठिसूळ होण्याची शक्यता असते.त्यामुळे हेअर स्टायलिंग करताना ब्रेडिंग, एअर ड्रायिंग किंवा फोम रोलर्स यासारख्या उष्माविरहित स्टाइलिंग तंत्रांचा वापर करा.

38

केस ओढून बांधणे, घट्टपणे बांधणे आणि सारखा जुडा केल्यामुळेही केसगळती, केस तुटणे आणि डोकेदुखी होऊ शकते. त्यामुळे केस बांधण्यासाठी मऊ आणि साधे बो किंवा क्लचर वापरा.

48

शॅम्पू केल्यानंतर केसांचे नैसर्गिक तेल निघते. त्यामुळे केस धुतल्यानंतर केसांना कंडिशनिंग करणे महत्वाचे आहे. कंडिशनिंग केल्यामुळे केसवाढीसाठी आवश्यक हायड्रेशनची कमतरता भासणार नाही.

58

शॅम्पू केल्यानंतर केसांसोबत टाळूही कोरडी पडते आणि त्याची नैसर्गिक चमक नाहीशी होते. त्यामुळे नेहमी कमी प्रमाणात धुवा. वारंवार केस धुणे टाळा.

68

ओले केस अधिक ठिसूळ असल्याने, तुटणे टाळण्यासाठी त्यांना हलके ब्रश करा. तसेच रुंद-दात असलेला कंगवा किंवा ब्रश वापरा. योग्य ब्रश केवळ तुमचे केस सांभाळत नाही तर टाळूमध्ये रक्त प्रवाहास प्रोत्साहन देतो, ज्यामुळे केसांच्या विकासास चालना मिळते.

78

केसांसाठी योग्य सीरमचा वापर करणेही आवश्यक आहे. सीरम रुक्ष आणि कडक केस मऊ करण्याचे काम करते. तसेच केसांना चमक देऊन ओलावा आणि पोषण देते.

88

केस टॉवेलने वाळवताना त्यामध्ये कमीत कमी घर्षण होईल असे बघा. अन्यथा या घर्षणामुळे केस जास्त तुटतात. केसगळती थांबवण्यासाठी ते सुकविण्यासाठी मायक्रोफायबर कापड वापरा.

  • FIRST PUBLISHED :