NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / लाइफस्टाइल / ओटीपोटाच्या दुखण्यावर उत्तम आहेत हे घरगुती उपाय, वेदनेपासून मिळेल त्वरित आराम

ओटीपोटाच्या दुखण्यावर उत्तम आहेत हे घरगुती उपाय, वेदनेपासून मिळेल त्वरित आराम

अनेक त्रासांमुळे ओटीपोटात वेदना होऊ शकतात. गॅसपासून ते अॅपेन्डिसायटिसपर्यंत. ओटीपोटातील त्रास क्रॅम्प सारखी वेदना अतिसार, बद्धकोष्ठता, फुगवणे किंवा पोट फुगणे यांच्याशी संबंधित असू शकते.

111

अनेकदा स्त्रियांना ओटीपोटात वेदना मासिक पाळी, गर्भपात किंवा पुनरुत्पादक गुंतागुंतांशी संबंधित असू शकते. ही वेदना येते आणि जाते आणि उपचार न करताही बरी होते. आज आम्ही तुम्हाला यावर काही घरगुती उपाय सांगणार आहोत.

211

दालचिनी : दालचिनीमध्ये अनेक अँटिऑक्सिडंट्स असतात जे पचनक्रिया सुधारतात. ओटीपोटात दुखत असल्यास एक दालचिनीचा एक तुकडा चघळा. याने तुम्हाला बरं वाटेल.

311

लवंग : लवंगामध्ये काही औषधीय पदार्थ असतात जे पोटातील गॅस कमी करण्यास आणि जठरासंबंधी स्राव वाढविण्यास मदत करतात. ज्यामुळे दबाव आणि क्रॅम्पिंग कमी होऊ शकते.

411

तुळस : तुळशीमधील औषधी गुणधर्म गॅस कमी करू शकतात, भूक वाढवू शकतात, पेटके दूर करू शकतात आणि संपूर्ण पचन सुधारू शकतात. तुळशीमधील युजेनॉल पोटातील ऍसिडचे प्रमाण कमी करते.

511

नारळपाणी : नारळपाण्यात पोटॅशियम आणि मॅग्नेशियमचे प्रमाण जास्त असते. हे पोषक द्रव्ये वेदना कमी करतात. ओटीपोटात दुखत असल्यास दर 4-6 तासांनी 2 ग्लास नारळाचे पाणी हळू हळू प्यावे.

611

केळी : केळ्यामध्ये व्हिटॅमिन बी6, पोटॅशियम आणि फोलेट असते. हे पोषक द्रव्ये पेटके, वेदना आणि स्नायूंच्या उबळ कमी करण्यास मदत करतात.

711

अंजीर : ओटीपोटात दुखत असल्यास दिवसातून काही वेळा संपूर्ण अंजीर फळ खाण्याचा प्रयत्न करा. यामुळे तुम्हाला वेदनेपासून मुक्ती मिळण्यास मदत जोते.

811

लिंबू पाणी : ओटीपोटाच्या दुखण्यावर लिंबू पाणी हा एक उत्तम पर्याय आहे. लिंबाचा अल्कधर्मी प्रभाव पोटातील अतिरिक्त आम्लता शांत करण्यास मदत करतो.

911

जिरे : ओटीपोटाच्या दुखण्यावर घरगुती उपाय म्हणून जिरे हा एक उत्तम पर्याय आहे. हे हायपर असिडिटी, ओटीपोटात वायू पसरणे आणि वेदना कमी करण्यास मदत करते.

1011

पुदिना : ओटीपोटातील वेदना कमी करण्यासाठी पुदिन्याची पाने कच्ची किंवा शिजवून खावी. ती वेलचीसह उकळून त्याचा चहादेखील केला जाऊ शकतो.

1111

पाणी : डिहायड्रेशनमुळे उलट्या आणि जुलाबामुळे पोट खराब होऊ शकते. भरपूर पाणी प्यायल्याने तुमच्या पचनसंस्थेतील आम्ल निघून जाऊ शकते ज्यामुळे तुम्हाला सुखदायक परिणाम मिळतो.

  • FIRST PUBLISHED :