अनेक लोकांना असा गैरसमज असतो की, स्विमिंग पूलमध्ये पोहल्याने त्वचा काळी पडते. मात्र होय, स्विमिंग पूलमध्ये क्लोरीन नावाचे रसायन असते, ज्याच्या दीर्घकाळ संपर्कामुळे त्वचा कालांतराने टॅन होऊ शकते. मात्र हा प्रभाव काही काळच राहतो. एबीपी माझामध्ये याबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली आहे.
स्विमिंग पूलमध्ये पोहल्यानंतर काळी झालेली त्वचा स्वतःच बरी होते. स्विमिंग पूलमध्ये दीर्घकाळ राहिल्याने सनबर्न आणि त्वचेच्या इतर आजारांचा धोका वाढू शकतो. अशावेळी तुमच्या त्वचेवरील टॅन कमी करण्यासाठी आम्ही तुम्हाला काही उपाय सांगत आहोत.
त्वचा एक्सफॉलिएट करा : स्विमिंग पूलच्या पाण्यामुळे झालेले टॅन कमी करण्यासाठी आणि मृत पेशी काढून टाकण्यासाठी सौम्य एक्सफोलिएटिंग स्क्रब वापरा. यामुळे त्वचेचे टॅनिंग कमी करण्यास मदत होते.
त्वचेवर लिंबाचा रस वापरा : ताज्या लिंबाचा रस टॅन केलेल्या भागावर लावून 10-15 मिनिटे सोडा. लिंबू नैसर्गिक ब्लीचिंग एजंट आहे, ज्यामुळे त्वचेचा रंग उजळण्यास मदत करू शकते.
दही, हळदीचा मास्क वापरा : त्वचेवरील टॅन घालावण्यासाठी दही आणि हळद टाकून मिश्रण बनवा. ही पेस्ट टॅनिंग असलेल्या भागावर लावा आणि 15 मिनिटांनंतर धुवा. हळद त्वचेवरचे टॅनिंग करू शकते तर दही त्वचेला मॉइश्चरायझ करते आणि पोषण देते.
त्वचेवर कोरफड वापरा : कोरफडीचा ताजा गर टॅन झालेल्क्य भागावर लावा आणि 20-30 मिनिटे सोडा. कोरफड त्वचा मऊ करून तत्वचेवरचे टॅन घालवण्यास मदत करते.
स्विमिंग पूलमध्ये जाण्यापूर्वी टॅनिंगपासून वाचण्यासाठी हाय SPF असलेले ब्रॉड-स्पेक्ट्रम सनस्क्रीन लावा. हे टॅन गडद होण्यापासून रोखण्यास मदत करेल. त्याचबरोबर स्विमिंग पूलमधून बाहेर आल्यानंतर शॉवर घ्या आणि त्यानंतर त्वचा चांगल्या प्रकारे मॉइश्चरायझ करा.