व्हिएतनाममध्ये राहणाऱ्या एका 49 वर्षांची व्यक्ती हो वान लांग गेल्या 41 वर्षांपासून आपले वडील आणि भावासंह घनदाट जंगलांमध्ये राहत होती. आश्चर्य म्हणजे त्याला जगात महिला असतात याबद्दल माहितीही नाही. जगभरात सध्या हा खराखुरा टार्झन म्हणून समोर आला आहे.
1972 मध्ये व्हिएतनाम युद्धाच्या शेवटी हो वान लांगची आई आणि दोन भाऊ-बहिणींचा अमेरिकेतील हल्ल्याचा मृत्यू झाला होता. ज्यानंतर तो आपल्या वडिलांसह गाव सोडून लांग क्वांग येथील ताई ट्रा जिल्ह्यातील घनदाट जंगलात राहत होते. गेल्या चार दशकात त्याने फक्त 5 जणांनाच पाहिलं आहे.
हो वान आपले वडील आणि भावासोबत घटदाट जंगलात राहत होता. तिथं तो मध, फळं, आणि जंगली प्राणी खाऊन पोट भरत असे.
जंगलात राहण्यासाठी त्यांनी एक छोटंसं घरदेखील तयार केलं होतं. 2015 मध्ये फोटोग्राफर अल्वारो सेरेज़ो यांनी या जंगलात राहणाऱ्या कुटुंबाची माहिती मिळवली होती. त्याने तिघांना जंगलातून रेस्क्यू केलं होतं.
आता एका छोट्याशा व्हिएतनामी गावात राहणारं हे कुटुंब तेथील लोकांसोबत राहण्याचा प्रयत्न करत आहेत.