गोंदिया येथे अग्रेशन जयंती मोहत्सव निमित्त अग्रवाल महिला समिती द्वारे वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम घेण्यात आले होते.
यादरम्यान महिलांसाठी आगळी वेगळी रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
रांगोळी काढणं ही एक सुंदर आणि अदभुद कला आहे. प्रत्येक महिलेच्या हातात थोड्या फार फरकाने ही कला असतेच मात्र काही महिलांचे यात विशेष प्राविण्य असते.
या स्पर्धेत भाग घेण्यासाठी अशी आत होती की, सहभागी महिलांनी परिधान केलेल्या साडी किंवा ड्रेसवर ज्याप्रकारचे डिझाईन असेल तशीच हुबेहूब रांगोळी काढायची.
अशी रांगोळी काढण्यासाठी सहभागी महिलांना ४५ मिनिटांचा कालावधी देण्यात आला होता आणि या वेळेतच महिलांनी त्यांची रांगोळी पूर्ण केली.
सहभागी सर्वच महिलांनी एकापेक्षा एक सुंदर रांगोळ्या काढल्या होत्या. महिलांची ही आगळी वेगळी कला खरंच कौतुकास्पद आहे.
या रांगोळी स्पर्धेत पहिला क्रमांक नेहा सिंगानिया या महिलेने पटकावला आहे. या रांगोळीचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरलदेखील झाला.
या रांगोळीत साडीवरील राधा कृष्णाच्या चित्राचे हुबेहूब रेखाटन करण्यात आले आहे. यातील रंगसंगतीदेखील खूपच सुंदर आहे.
या रांगोळी स्पर्धेतील सर्वच रांगोळ्या पाहण्यासारखा आहेत. तुम्हीही दसऱ्याला अशीच एखादी डिझाईन किंवा या महिलांप्रमाणे तुमच्याच एखाद्या साडीवरील डिझाईन रांगोळी म्हणून काढू शकता.
या रांगोळ्या इतक्या सुंदर आहेत की, पाहणाऱ्या प्रत्येकाला त्या आवडल्या.