पावसामुळे या ठिकाणी नवीन चैतन्य निर्माण होते, पावसाळ्यातील आल्हाददायक वातावरण या ठिकाणांचे सौंदर्य आणखी वाढवते. या वातावरणाचा तुम्ही इतर ऋतूंमध्ये आनंद घेऊ शकत नाही. चला तर पाहुयात महाराष्ट्रातील ही पावसाळी ठिकाणं. इंडियाडॉटकॉमने याविषयी सविस्तर माहिती दिली आहे.
लोणावळा : मुंबई आणि पुण्याच्या लोकनाचे आवडते विकेंड डेस्टिनेशन आणि पावसाळ्यातील एक उत्तम पर्यटन स्थळ म्हणून लोणावळा प्रसिद्ध आहे. पावसाळ्यात लोणावळ्यातील धबधबे पाहण्यासाठी लोक तिथे जातात.
माथेरान : माथेरान हे मुंबईपासून फक्त 80 किमी अंतरावर आहे. हे महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध हिल स्टेशन आहे. येथे काही सुंदर हिरवागार निसर्ग आणि टेकड्या आहेत. पावसाळ्यात इथले वातावरण खूपच सुंदर असते.
महाबळेश्वर : रोड ट्रीपसाठी मुंबई, पुण्याच्या लोकांसाठी महाबळेश्वर उत्तम ठिकाण आहे. महाबळेश्वर मॅप्रो गार्डन, स्ट्रॉबेरी आणि आजूबाजूच्या हिरव्या टेकड्यांसाठी ओळखले जाते. दरवर्षी पावसाळ्यात अनेक लोक महाबळेश्वरची ट्रिप करतात.
भंडारदरा : भंडारदरा हे तिथल्या निसर्गसौंदर्य आणि प्रसन्न वातावरणासाठी ओळखले जाते. भंडारदरा हे पर्यटकांमध्ये झपाट्याने लोकप्रिय होत आहे. आजूबाजूच्या टेकड्यांमुळे ट्रेकिंगच्या भरपूर संधी आहेत आणि पर्यटकांसाठी मुक्कामाचे अनेक पर्याय आहेत.
माळशेज घाट : माळशेज घाटावरून जाताना तुम्हाला काही विलक्षण धबधबे आणि सुंदर व्हॅली पाहायला मिळतात. हे एक धुके असलेले हिल स्टेशन आहे. पावसाळ्यात अनेक लोक हा प्रवास आवर्जून करतात.
भीमाशंकर : भीमाशंकर हे ज्योतिर्लिंग मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. पावसाळ्यात भीमाशंकर डोंगराळ प्रदेश, धबधब्यांमुळे आणखी सुंदर बनते. देवदर्शनासोबतच येथील हिरवळ आणि नैसर्गिक सौंदर्य पर्यटकांचे मन मोहून घेते.
कळसूबाई : कळसूबाई हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर आहे. शिखरावरील वाऱ्यामुळे तिथे जास्त वेळ थांबणे कठीण असते. मात्र थोडा वेळ का होईना या शिखरावरून दिसणारे विलोभनीय दृश्य पाहण्यासाठी अनेक लोक हा शिखर सर करतात.