NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / लाइफस्टाइल / Parenting Tips : मुलं सकाळी चहासाठी हट्ट करतात? पण अजिबात देऊ नका, मुलांच्या मेंदूवर होतो घातक परिणाम!

Parenting Tips : मुलं सकाळी चहासाठी हट्ट करतात? पण अजिबात देऊ नका, मुलांच्या मेंदूवर होतो घातक परिणाम!

आपल्या देशात चहा पिणाऱ्यांची संख्या अधिक आहे. यात केवळ वडीलधारी मंडळीच नाहीत तर लहान मुलेही आहेत. अनेक मुले अंथरुणातून उठल्याबरोबर चहाची मागणी करतात. त्यांचे पालकही त्यांना चहा देतात. मात्र असे करणे चुकीचे आहे. सकाळी चहा पिण्याच्या सवयीमुळे मुलांच्या वाढीवर चुकीचा परिणाम होतो. कसे ते पाहा..

15

शारीरिक विकास रोखणे : WebMD च्या बातमीनुसार, चहा कोणत्याही वयोगटासाठी हानिकारक असला तरी मुलांसाठी तो अधिक घातक आहे. चहाचा थेट परिणाम मुलांच्या पचनसंस्थेवर होतो. चहा किंवा कॉफीमध्ये कॅफिनचे प्रमाण जास्त असते. कॅफिन इतर पोषक तत्वांना पोटात शोषून घेऊ देत नाही. यामुळे मुलांचा शारीरिक विकास मंदावतो.

25

झोपेच्या समस्या : चहा किंवा कॉफीमध्ये आढळणारे कॅफिन थेट आपल्या मानसिक क्रियाकलापांवर परिणाम करते. यामुळे झोपेची योग्य पद्धत विस्कळीत होते. जर तुमचे मूल दिवसा किंवा संध्याकाळी चहा घेत असेल तर त्याच्या झोपेत अडथळा येतो. त्यामुळे हळूहळू झोपेशी संबंधित समस्या सुरू होतात.

35

हृदयाशी संबंधित समस्या : चहा आणि कॉफीचा मुलांच्या आणि प्रौढांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. चहा किंवा कॉफीमध्ये असलेले कॅफिन हृदयाला नुकसान पोहोचवते आणि रक्तदाब वाढवते. याशिवाय रक्तदाब वाढल्याने थेट हृदयालाही हानी पोहोचते.

45

नैराश्य वाढते : नैराश्य वाढवण्यासाठी कॅफिन पुरेसे आहे. शरीरात कॅफिन पोहोचण्याचा सर्वात मोठा स्त्रोत म्हणजे चहा आणि कॉफी. चहा प्यायल्याने चिंता, नैराश्य आणि तणाव यांसारख्या समस्या वाढतात. अशा परिस्थितीत जर तुमचे मूल देखील चहा पीत असेल, तर त्याच्यामध्येही या समस्यांचा धोका जास्त असू शकतो.

55

पचन बिघडते : चहा किंवा कॉफी प्यायल्याने मुलांचे पचन बिघडते. चहामुळे बद्धकोष्ठता आणि मळमळ यासारख्या समस्यांचा धोका असतो. जर मुल दिवसभरात रिकाम्या पोटी चहा घेत असेल तर त्याच्या आहारावर देखील परिणाम होऊ शकतो.

  • FIRST PUBLISHED :