NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / लाइफस्टाइल / Beer Day : मर्यादेत घेतली तर बिअरही औषध; पण नेमकी किती प्यायची, हे घ्या परफेक्ट प्रमाण

Beer Day : मर्यादेत घेतली तर बिअरही औषध; पण नेमकी किती प्यायची, हे घ्या परफेक्ट प्रमाण

बिअर पिणं चांगलं की वाईट हा प्रश्न खूप संभ्रमात टाकणारा आहे. बिअर जर तुम्ही माध्यम प्रमाणात घेतली तर तिचे फायदे अनेक आहेत. मात्र कोणत्याही पदार्थाचे अतिसेवन केल्यास त्याचा वाईट परिणामही होतोच.

110

28 सप्टेंबर ड्रिंक बिअर डे मानला जातो. बिअर डे निमित्त आम्ही बियर पिण्याचे काही फायदे सांगणार आहोत. E Times ने दिलेल्या माहितीनुसार, बिअर पिण्याचे काही फायदे आहेत. मात्र याचा अर्थ असा नाही बिअर तुम्ही जास्त प्रमाणात पिऊ शकता.

210

एका संशोधनात असे आढळून आले आहे की उन्हाळ्याच्या हंगामात रात्रीच्या जेवणासोबत बिअर पिणे तुमच्या आतड्यातील चांगल्या आणि निरोगी बॅक्टेरियासाठी फायदेशीर आहे.

310

एका दिवसात एक किंवा दोन कॅन या प्रमाणात बिअर पिणे तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. प्रमाणात बियर प्यायल्याने तुमचे शरीर आणि मेंदू दोन्ही शांत आणि आनंदी होते.

410

प्रमाणात बिअर पिणे तुमच्यासाठी चांगले आहे. अनेक अभ्यासांमध्ये सांगितले गेले आहे की, माध्यम प्रमाणात मद्यपान करणारे लोक इतरांपेक्षा जास्त काळ आणि चांगले आयुष्य जगतात.

510

बिअर तुमच्या शरीरातील कोलेस्ट्रॉल लेव्हल सुधारू शकते. माफक प्रमाणात बिअर प्यायल्याने तुमचे एचडीएल/एलडीएल कोलेस्टेरॉलचे प्रमाण नियंत्रित राहू शकते.

610

संशोधनानुसार बिअरमध्ये असे काही घटक असतात जे मधुमेहाचा धोका कमी करण्याचे काम करतात. इतकेच नाही तर उच्च रक्तदाब टाळण्यासही मदत होते. मात्र व्यायाम आणि योग्य आहार एकाच वेळी घेतला तरच फायदा होतो.

710

फिल्टर न केलेली किंवा हलकी फिल्टर केलेली बिअर बर्‍यापैकी पौष्टिक असल्याचे दिसून येते. बिअरमध्ये ब जीवनसत्त्वे, फॉलिक अॅसिडचे प्रमाण जास्त असते, जे हृदयविकाराचा झटका टाळण्यास मदत करते असे मानले जाते.

810

जर तुम्ही अशा एखाद्या जागी असाल जिथे तुम्हाला पाणी न पिण्याचा सल्ला दिला जातो. तर स्थानिक बिअर स्थानिक बाटलीबंद पाण्यापेक्षाही सुरक्षित आहे.

910

जास्त बिअर प्यायल्याने तुमचे वजन वाढू शकते, पण त्यात वाइनपेक्षा कमी कॅलरीज असतात आणि त्यामुळे माफक प्रमाणात सेवन केल्यास वजन कमी होण्यास मदत होते.

1010

बिअर संत्र्याचा रस किंवा दुधाइतकीच नैसर्गिक आहे. बिअरला प्रिजर्व्हेटिव्हची गरज नसते. कारण त्यात अल्कोहोल असते. बिअरमध्ये कॅलरीज आणि कार्बोहायड्रेट्स कमी असतात. तर त्यात फॅट किंवा कोलेस्ट्रॉल नसते.

  • FIRST PUBLISHED :