NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / लाइफस्टाइल / कमी पैशात करा मस्त शॉपिंग, मुंबईत इथं मिळतात बांधणीचे ड्रेस, PHOTOS

कमी पैशात करा मस्त शॉपिंग, मुंबईत इथं मिळतात बांधणीचे ड्रेस, PHOTOS

मुंबईत बांधणीचे ड्रेस स्वस्तात मिळणारं मार्केट माहिती आहे का? पाहा स्वस्तात मस्त मार्केट..

19

बांधणीचे ड्रेस हा प्रकार महिलांमध्ये सध्या चांगलाच लोकप्रिय आहे. कोणत्याही गटातील महिलांना बांधणीचे ड्रेस शोभून दिसतात.

29

या ड्रेसचा विचार केला की अनेकांना गुजरात राज्य पहिल्यांदा आठवते. गुजरातमधील गांधीनगरमधील बांधणीचे ड्रेस चांगलेच फेमस आहेत. पण, आता या ड्रेससाठी गुजरातचा विचार करण्याची गरज नाही. आपल्या मुंबईतही होलसेल भावात हे ड्रेस मिळतात

39

मुंबईच्या दादर मार्केटमधील दुकाना विविध रंगाचे आणि पॅटर्नचे बांधणीचे ड्रेस मटेरियल मिळतात. अगदी अस्सल कॉटनची बांधणी असल्यामुळे या ड्रेसला चांगली मागणी आहे.

49

लग्नसमारंभ किंवा घरगुती कार्यक्रमात या प्रकारचे ड्रेस घालण्यास अनेक महिलांची पसंती असते. बांधणी ही कापडावर विशिष्ट पद्धतीने गाठ बांधून तयार केली जाते.

59

कॉटन, सिल्क अश्या विविध प्रकारच्या कपडावर ही डिझाईन तयार केली जाते. उन्हाळा आला की कॉटनच्या बांधणी ड्रेसची मागणी वाढते. बांधणीच्या पण वेगवेगळ्या डिझाईनचा यामध्ये समावेश असतो.

69

बांधणी वायफाय डिझाईन, बांधणी लखनवी वर्क, बांधणी ऑल ओव्हर बुट्टा कॉटन सॅटिन, बांधणी जयपुरी कॉटन, बांधणी गुल्टी डिझाईन, बांधणी कॉटन सॅटिन, बांधणी झूमकी डिझाईन, बांधणी चेक्स डिझाईन, बांधणी लखनवी तार वर्क, या वेगवेगळ्या डिझाईनचे 10 - 12 रंग इथं तुम्हाला पाहता येतील.

79

या बांधणी ड्रेसला संपूर्ण महाराष्ट्रातून मागणी आहे. महाराष्ट्रातील विविध शहरांमधून होलसेल खरेदीसाठी विक्रेते येथेच येतात. 500 रुपये ते 1000 रुपयांच्या आत बांधणी ड्रेस मटेरियल मिळतात.

89

लखनवी वर्क आणि लखनवी तार वर्क या डिझाईनला मोठी मागणी आहे. या दुकानातील लखनवी वर्कचे कापड खास आहे.

99

दादरमधील हिंदमाता हा परिसर कपड्यांसाठी प्रसिद्ध आहे. विशेषत: इथं महिलांच्या कपड्यांचे अनेक प्रकार मिळतात. याच परिसरात राजलक्ष्मी क्रियएशन या दुकानात बांधणीचे ड्रेस मटेरियल होलसेल भावात मिळतात.

  • FIRST PUBLISHED :