अमेरिकेत राहणाऱ्या एरियल टायसन नावाच्या महिलेने आतापर्यंत 6 मुलांना जन्म दिला आहे. तरीही, तिच्या 8 व्या गर्भधारणेबद्दल ती खूप आनंदी आहे. त्यांच्या कुटुंबाचं वैशिष्ट्य म्हणजे एरिअल सोडून एकजात सगळे पुरुष आहेत.
आधीच 6 मुलांची आई असलेल्या एरियलने आपलं 7 वं मूल गमावलं. 8 व्या वेळी पुन्हा गर्भवती झाल्यानंतर, ती मुलाच्या जन्माबद्दल उत्साहित आहे.
कुटुंबात सर्वच मुलगे. त्यामुळे आता तरी तिला मुलगी होणार का याविषयी उत्सुकता आहे. पण एरियल म्हणते की मुलगा-मुलगी काहीही असलं तरी मी त्याचं आनंदाने स्वागत करेन.
ती तिचं कुटुंब, मुलं आणि गर्भधारणेचे सर्व फोटो आणि माहिती सोशल मीडियावर शेअर करत राहते. त्याच्या कुटुंबाचे टिकटॉक आणि इन्स्टाग्रामवर लाखो फॉलोअर्स आहेत.
गर्भधारणा एरियल तिच्या 6 मुलांना घरी शिकवते आणि वाढवते. त्यांची जीवनशैली पाहण्यासाठी सुमारे 23 लाख लोक सोशल मीडियावर त्यांना फॉलो करतात.
या कुटुंबाने आठव्या मुलासाठी घरगुती जन्माची योजनाही आखली आहे. हे कुटुंब टेनेसीमध्ये राहते आणि मुलाच्या जन्मापूर्वीच त्यांनी त्यांच्या घराचं नूतनीकरणही केले आहे.