NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / लाइफस्टाइल / Kneaded Dough : तुम्हीही मळलेली कणिक फ्रिजमध्ये ठेवता? मग याचे दुष्परिणाम नक्की वाचा!

Kneaded Dough : तुम्हीही मळलेली कणिक फ्रिजमध्ये ठेवता? मग याचे दुष्परिणाम नक्की वाचा!

side effects dough kneaded : पावसाळ्यात खाण्यापिण्याचे पदार्थ लवकर खराब होऊ लागतात. तुम्हीही मळलेली कणिक फ्रिजमध्ये ठेऊन पुन्हा वापरता का? असे करत असाल तर आजपासून ही सवय सोडा, नाहीतर या सवयीमुळे तुम्हाला अनेक त्रासांचा सामना करावा लागू शकतो.

18

पावसाळ्यात संसर्गाचा धोका अधिक असतो. त्यामुळे आरोग्याची विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो. या ऋतूमध्ये होणाऱ्या बदलांमुळे आपल्या शरीरातील चयापचय क्रिया मंदावते. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होऊ लागते. त्यामुळे आजारी पडण्याचा धोका वाढतो.

28

अशा ऋतूतील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपला आहार. त्यामुळे काही पदार्थ खाणे टाळावेत. अनेक घरांमध्ये या मोसमात पीठ पॅक करून फ्रीजमध्ये ठेवले जाते आणि नंतर वापरले जाते, जे धोकादायक ठरू शकते.

38

अशा चुकीमुळे आरोग्यावर वाईट परिणाम होतो आणि तुम्ही आजारीही पडू शकता. चला तुम्हाला त्यामागचे कारण जाणून घेऊया.

48

पीठ खराब होण्याचा धोका : अनेकदा मळलेले पीठ फ्रिजमध्ये ठेऊन काही काळानंतर वापरले जाते. पीठ खराब होऊ नये म्हणून फ्रीजमध्ये ठेवलं जातं, मात्र पावसाळ्यात पिठात बॅक्टेरिया तयार होऊ शकतात. काही जीवाणू आहेत, जे अन्न विषबाधा होण्याचा धोका वाढवतात. याशिवाय अॅसिडिटी आणि बद्धकोष्ठतेची समस्या देखील होऊ शकते.

58

बॅक्टेरियाचा वाढलेला धोका : अनेक संशोधनांनी असे म्हटले आहे की, बहुतेक जीवाणू कमी तापमानात निर्माण होऊ शकतात. पावसाळ्यात लिस्टेरिया मोनोसाइटोजेन्स नावाच्या बॅक्टेरियामुळे अनेक प्रकारचे गंभीर आजार होऊ शकतात.

68

फ्रीजमध्ये कमी तापमानामुळे बॅक्टेरिया वाढतात. त्यामुळे जेव्हाही तुम्ही फ्रीजमध्ये काही ठेवता तेव्हा ते आधी नीट स्वच्छ करा.

78

मळलेले पीठ कसे साठवावे : आरोग्य तज्ज्ञांच्या मते पावसाळ्यात फक्त ताजे पीठ वापरावे. पीठ मळून फ्रीजमध्ये ठेवायचे असेल तर पीठ मळताना त्यात पाण्याचे प्रमाण जास्त ठेवू नका.

88

कारण जास्त पाणी असलेले पीठ लवकर खराब होते. मळलेले पीठ फ्रीजमध्ये ठेवण्यासाठी तुम्ही एअर टाईट कंटेनर किंवा झिप लॉक बॅग वापरू शकता.

  • FIRST PUBLISHED :