NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / लाइफस्टाइल / पावसाळ्यात मुलांना निरोगी ठेवायचंय? तर करून पाहा या 4 सोप्या गोष्टी

पावसाळ्यात मुलांना निरोगी ठेवायचंय? तर करून पाहा या 4 सोप्या गोष्टी

पावसाळ्यामध्ये अनेक आजार डोकं वर काढतात. या काळात लहान मुलांना खूप जपायला लागतं. नियमितपणे या 4 सोप्या गोष्टींची काळजी घेतली तर मुलांना आजारांपासून दूर ठेवता येईल.

15

पावसाळ्यात, डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुनिया, व्हायरल ताप, सर्दी आणि खोकला यासारख्या अनेक आजार मुलांसाठी त्रासदायक ठरतात. या पावसाळ्यात मुलांना निरोगी ठेवण्यासाठी आपण या 4 गोष्टी करून पाहा.

25

मुलांना योग्य कपडे घाला : पावसाळ्यात तापमानात चढ-उतार होताच डासांच्या दहशतीतही वाढ होते. म्हणूनच, मुलांना अशा प्रकारे कपडे घातले पाहिजेत की त्यांचे हात पाय देखील झाकले जातील. मुलांना हलके म्हणजे सुती कपडे घाला आणि तापमानानुसार बदलत राहा.

35

डासांपासून वाचवा: पावसाळ्यात मुलांना डासांचा प्रादुर्भाव होण्यापासून वाचवण्यासाठी, त्यांना संपूर्ण कपडे घाला आणि खोलीत डासांच्या लिक्विडचा वापर करा. डासांना दूर ठेवण्यासाठी आपण घरी डास प्रतिकारक वनस्पती देखील लावू शकता.

45

स्वच्छ आणि पोषक आहार: मुलांना आजारांपासून वाचवण्यासाठी, त्यांची प्रतिकारशक्ती कायम राहिली पाहिजे. यासाठी तुम्ही मुलांना जंक फूड खाण्यापासून रोखलं पाहिजे आणि त्यांना पौष्टिक आहार द्यावा. यासाठी, त्यांच्या आहारात फळं, डाळी आणि हिरव्या भाज्या समाविष्ट करा.

55

दररोज बाळांना आंघोळ घाला: बर्‍याच लोकांना असं वाटतं की पावसाळ्यात मुलांनी दररोज आंघोळ करू नये, त्यानं सर्दी होते. पण हे चूक आहे. बाळाला संसर्गापासून वाचवण्यासाठी दररोज कोमट पाण्याने आंघोळ घालण्याची गरज आहे. आंघोळीपूर्वी मुलांना मसाज करणं देखील आवश्यक आहे. लक्षात ठेवा की मुलांना आंघोळ घालण्यासाठी तापमानानुसार थंड, कोमट किंवा गरम पाण्याचा वापर करा.

  • FIRST PUBLISHED :