NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / लाइफस्टाइल / दुधात शिळी पोळी खायला आवडते? या'वेळी खाल तर आरोग्याला होतील चमत्कारिक फायदे

दुधात शिळी पोळी खायला आवडते? या'वेळी खाल तर आरोग्याला होतील चमत्कारिक फायदे

Stale roti with milk Benefits : तुम्ही कधी दुधात मिसळलेली शिळी पोळी खाता का? नाहीतर आता नक्की खा. विशेषतः शिळी पोळी थंड दुधासोबत खाल्ल्याने अनेक फायदे होतात. पाहुयात ते कोणकोणते फायदे आहेत.

17

गव्हापासून बनवलेल्या पोळीमध्ये जास्त फायबर आणि कमी सोडियम, कमी ग्लायसेमिक इंडेक्स असते. ज्यामुळे पचनक्रिया व्यवस्थित राहते. दुधासोबत शिळी पोळी खाल्ल्यास अनेक फायदे होऊ शकतात.

27

थंड दुधात शिळी रोटी मिसळून त्याचे सेवन केल्यास रक्तदाबाची पातळी नियंत्रणात राहते. ज्या लोकांचा रक्तदाब जास्त राहतो त्यांच्यासाठी हे फायदेशीर ठरू शकते. तुम्ही ते नाश्त्यात किंवा रात्री खा.

37

दूध आणि पोळी रात्री खाल्ल्याने सकाळी पोट साफ होते, कारण गव्हाच्या पोळीमध्ये जास्त फायबर असते. दुधात कॅल्शियम असल्यामुळे हाडेदेखील मजबूत राहतात.

47

तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर पोळी आणि दूध तुम्ही खाऊ शकता. या पोळीमध्ये फायबर असल्याने त्याच्या सेवनाने पोट दीर्घकाळ भरलेले राहते. या फूड कॉम्बिनेशनमध्ये चयापचय वाढवण्याची क्षमता असते. त्यामुळे अन्न लवकर पचते, लवकर भूक लागत नाही आणि वजनही नियंत्रणात राहते.

57

थंड दुधात पोळी खाल्ल्याने शरीराचे तापमानही नियंत्रणात राहते. साधारणपणे शरीराचे तापमान 37 अंश सेल्सिअस राहिले पाहिजे, याच्या वर गेल्यास अनेक महत्त्वाच्या अवयवांना नुकसान होऊ शकते. दूध पोळी सकाळी खाल्यास शरीराला भरपूर पोषक द्रव्ये मिळतात.

67

ज्या लोकांना पोटदुखी, अपचन, गॅस, बद्धकोष्ठता, सूज येणे इत्यादी पोटाशी संबंधित समस्या आहेत त्यांनीही दूध आणि पोळी खावी. शिळी पोळी थंड दुधात टाकून रात्री झोपण्यापूर्वी खाल्ल्याने या सर्व समस्या दूर होतात.

77

तुम्हाला नेहमी थकवा आणि अशक्तपणा वाटत असेल तर रात्री दूध आणि पोळी खा. एकातून तुम्हाला अनेक पोषक घटक मिळतील, ज्याचा शरीराला फायदा होईल. सहनशक्ती आणि उर्जेची कमतरता जाणवणार नाही. पोळी आणि दूध खाल्ल्याने शरीराला शक्ती मिळते.

  • FIRST PUBLISHED :