NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / लाइफस्टाइल / Storing Eggs In Fridge : अंडी फ्रीजमध्ये ठेवणं योग्य आहे का? ही आहे अंडी साठवण्याची योग्य पद्धत

Storing Eggs In Fridge : अंडी फ्रीजमध्ये ठेवणं योग्य आहे का? ही आहे अंडी साठवण्याची योग्य पद्धत

सामान्यतः लोक घरात आणले जाणारे बरेच खाद्यपदार्थ फ्रिजमध्ये साठवतात. अंडीही त्यापैकीच एक आहे. परंतु तुम्हाला माहित आहे का की अंडी फ्रीजमध्ये ठेवण्याचे अनेक नुकसान होऊ शकतात.

17

सामान्यतः लोक अंडी फ्रीजमध्ये ठेवतात. हे जवळपास प्रत्येक घरात घडते. परंतु तुम्हाला माहित आहे का की अंडी फ्रीजमध्ये ठेवणे योग्य मानले जात नाही.

27

फ्रीझमध्ये ठेवलेली अंडी उकळल्यावर ती फुटतात. बऱ्याचदा अति थंडीमुळे फ्रीजमध्ये ठेवलेल्या अंड्यातील पोषक तत्वे नष्ट होतात.

37

अनेकदा अंड्याच्या वरच्या बाजूला घाण असते आणि लोक ते न धुता फ्रीजमध्ये ठेवतात, त्यामुळे फ्रीजमधील इतर गोष्टींनाही संसर्ग होतो.

47

अंडी फ्रीझमध्ये ठेवल्यानंतर सामान्य तापमानात ठेवल्यास कंडेन्सेशनची शक्यता वाढते. कंडेन्सेशनमुळे अंड्याच्या कवचावर असलेल्या बॅक्टेरियाचा वेग वाढू शकतो आणि आतमध्ये प्रवेश करण्याची शक्यता देखील वाढते. अशी अंडी खाणे धोकादायक असू शकते.

57

मात्र तरीदेखील तुम्हाला अंडी फ्रिजमध्ये स्टोअर करायची असतील तर त्यासाठी काय उपाय आहेत. हे जाणून घ्या. एबीपी माझ्याच्या बातमीमध्ये याबद्दल सविस्तर वृत्त दिलेले आहे.

67

अंडी रेफ्रिजरेटरच्या सामान्य तापमानावर ठेवा. यामुळे अंडी ताजेपणा टिकवून ठेवतात आणि खराब होण्याचा धोका कमी होतो. अंडी ओलावामुक्त वातावरणात ठेवा. कारण जास्त ओलावा अंडी खराब करू शकतो.

77

तुम्ही ज्या पॅकेजिंगमध्ये अंडी विकत घेतली त्याच पॅकेजिंगमध्ये ठेवा. पॅकेजिंग उघडले असेल तर अंडी हवाबंद कंटेनरमध्ये ठेवा. अंडी प्रथम शिजवून गोठविली जाऊ शकतात, जसे की ऑम्लेट किंवा उकडलेले अंडी.

  • FIRST PUBLISHED :