कोणतेही अन्न लगेच मिक्सरमध्ये टाकून बारीक केले जाते. मात्र तुम्हाला माहित आहे का की मिक्सरमध्ये काही काही पदार्थ वाटल्याने तुमचे मिक्सर खराब होऊ शकते..? चला तर मग बघूया कोणते पदार्थ मिक्सरमध्ये ग्राइंड करू नयेत. E Times ने याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे.
बटाटे : स्वयंपाकात बटाट्यांचा अनेक प्रकारे वापर होतो, परंतु ते मिक्सरमध्ये बारीक करू नये. कारण बटाट्यांमध्ये स्टार्च असते आणि ब्लेडच्या वेगवान हालचालीमुळे ते आणखी स्टार्च सोडू शकतात. यामुळे तुमचे काम वाढेल आणि तुम्हाला अपेक्षित परिणाम मिळणार नाही.
बेरीज : ब्ल्यूबेरी, स्ट्रॉबेरी किंवा गोठवलेले पदार्थ मिक्सरमध्ये टाकणे टाळा. कारण ते खूप मजबूत असतात आणि मिक्सरला ते तोडणे कठीण होऊ शकते. यामुळे मिक्सरची ब्लेड खराब होऊ शकते. त्यामुळे हे पदार्थ रूम टेम्परेचरला आल्यावरच मिक्सरमध्ये टाका.
गरम पदार्थ : मिक्सरमध्ये चुकूनही गरम वस्तू टाकू नका. उदाहरणार्थ, बहुतेक लोक त्यांच्या मिक्सरमध्ये गरम ग्रेव्हीज बारीक करण्याचा प्रयत्न करतात. परंतु यामुळे भरपूर वाफ आणि दाब तयार होऊ शकतो, ज्यामुळे ते स्फोट होण्याचा किंवा सांडण्याचा धोका असतो.
कणिक : काही लोक मिक्सरमध्ये पीठ मळण्याचा प्रयत्न करतात. ते अजिबात करू नये. मिक्सरचे ब्लेड यासाठी डिझाइन केलेले नाहीत. पीठासाठी मिक्सर वापरल्याने चांगले परिणाम मिळणार नाहीत.
कॉफी : काही लोक शुद्ध आणि स्वादिष्ट कॉफी पिण्यासाठी घरी कॉफी बीन्स बारीक करतात. पण कॉफी बीन्स बारीक करण्यासाठी मिक्सर वापरू नका. यामुळे बीन्स मिक्सरच्या ब्लेडमध्ये अडकू शकतात. त्यामुळे कॉफी बीन्स कॉफी ग्राइंडरमध्ये बारीक करून घेणे चांगले.