जिनेविव्ह यांचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. किआरा आणि तिच्या आईचे सोबत फोटो पाहाता, दोघांमधील नातं आई-मुलगी नाही तर मैत्रिणी किंवा बहिणिंसारखं वाटेल.
किआराच्या लग्नात आई जेनेविव्ह लेहेंगा घातलेली दिसली होती. ज्यामध्ये ती फारच सुंदर दिसत होती, त्यानंतर मात्र तिच्या सैंदर्याची सर्वत्र चर्चा सुरु झाली. आता प्रत्येकजण कियाराच्या आईचे म्हणजेच सिद्धार्थ मल्होत्राच्या सासूचे कौतुक करताना थकत नाही.
कियारा अडवाणी ही सिंधी कुटुंबातील आहे. तिचे वडील प्रसिद्ध उद्योगपती आहेत. पण फार कमी लोकांना माहित असेल की कियाराची आई जेनेव्हिव्ह ही शिक्षिका आहे. तेसच तिचा संबंध मुस्लिम कुटुंबाशी देखील आहे.
कियाराची आई जेनेव्हिव्हचे वडील मुस्लिम होते आणि उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊचे रहिवासी होते. तसेच त्यांची आई म्हणजेच कियाराची आजी स्कॉटिश ख्रिश्चन होती. त्यामुळे कियाराची आई ही स्कॉटिश आणि मुस्लीम देखील आहे.
कियारा आणि तिची आई जेनेव्हिव्ह यांचे एकमेकांशी जबरदस्त बॉन्डिंग आहे. किआराचा वाढदिवस साजरा करताना देखील त्या ऐकत्र दिसल्या. एवढंच काय तर अनेक पार्टीत देखील दोघी एकत्र दिसल्या.
जेनेविव्ह जरी वयाने मोठ्या असल्या तरी फॅशनच्या बाबतीत त्या मुलगी कियारापेक्षा कमी नाही. हे तुम्हाला हा फोटो पाहून लक्षात आलंच असेल.
लग्नात देखील किअरा आणि आईने मॅचिंग लेहंगा घातला होता, ज्यामध्ये दोघीही खूपच सुंदर दिसत आहेत.