NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / लाइफस्टाइल / धूम्रपान करता? तरीही Lungs ठेऊ शकता Healthy! आहारात घ्या हे पदार्थ

धूम्रपान करता? तरीही Lungs ठेऊ शकता Healthy! आहारात घ्या हे पदार्थ

फुफ्फुस हा शरीरातील अत्यंत महत्त्वाचा अवयव आहे. ते शरीराचे कार्य चांगले करण्यात मदत करण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. वायू प्रदूषकप्रमाणेच धुम्रपानाचा फुफ्फुसावरही नकारात्मक परिणाम होतो.

17

फुफ्फुस निरोगी ठेवण्यासाठी प्रामुख्याने श्वासोच्छवासाचा व्यायाम, सकस आहार घेणे आवश्यक आहे. असे काही पदार्थ आहेत जे फुफ्फुस निरोगी ठेवतात. चला जाणून घेऊया त्या पदार्थांबद्दल.

27

food.ndtv.com मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, संशोधकांच्या मते, फुफ्फुसांचे कार्य योग्य प्रकारे होण्यासाठी व्हिटॅमिन सी, ई आणि बीटा-कॅरोटीन खूप महत्वाचे आहेत. या सर्व गोष्टी सफरचंदात असतात. सफरचंदमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात, जे फुफ्फुसांना निरोगी ठेवण्यास मदत करतात.

37

अक्रोडमध्ये ओमेगा-३ फॅटी अॅसिड्स प्रामुख्याने असतात. मूठभर अक्रोड खाल्ल्याने दमा आणि श्वसनाच्या इतर समस्यांशी लढा मिळू शकतो. ओमेगा-३ फॅटी ऍसिड हे दाहक-विरोधी पोषक असतात, जे जळजळ संबंधित समस्या कमी करू शकतात.

47

बेरी खाल्ल्याने फुफ्फुसांनाही अनेक प्रकारे फायदा होतो. यामुळे फुफ्फुस निरोगी राहतात. ते व्हिटॅमिन सी सारख्या अँटीऑक्सिडंटमध्ये खूप जास्त असतात, जे मुक्त रॅडिकल्समुळे झालेल्या नुकसानापासून पेशींचे संरक्षण करतात.

57

लसणामध्ये फ्लेव्होनॉइड्स असतात, जे ग्लूटाथिओनचे उत्पादन उत्तेजित करतात. हे विष आणि कार्सिनोजेन्स कमी करण्यास मदत करते. तसेच फुफ्फुसांना चांगले कार्य करण्यास मदत करते.

67

ब्रोकोलीमध्ये फोलेट, फायटोकेमिकल्स, व्हिटॅमिन सी, कॅरोटीनॉइड्सचे प्रमाण जास्त असते, जे फुफ्फुसातील हानिकारक पदार्थांशी लढतात. ब्रोकोलीमध्ये एल-सल्फोराफेन नावाचा सक्रिय घटक असतो, जे पेशींना दाहक-विरोधी जनुकांवर स्विच करून श्वसन समस्यांपासून संरक्षण करू शकते.

77

बीएमसी कॅन्सर या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, उंदरांना फ्लॅक्ससीडयुक्त आहार दिल्याने रेडिएशनच्या संपर्कात येण्यापूर्वी फुफ्फुसाच्या ऊतींचे संरक्षण होतेच, शिवाय किरणोत्सर्गाच्या संपर्कात आल्यानंतर होणाऱ्या नुकसानीपासूनही संरक्षण होते.

  • FIRST PUBLISHED :