रिहाना - पॉपस्टारच्या या टॅटूने वाद ओढवून घेतला होता. भगवद्गीतेतलं एक अवतरण कंबरेच्या उजव्या बाजूला गोंदवून घेतलं आहे. काही संस्कृत विद्वानांनी या अवतरणातल्या चुकाही निदर्शनास आणल्या होत्या.
डेव्हिड बेकहॅम - व्हिक्टोरिया (त्याच्या पत्नीचे नाव) डेव्हिडने देवनागरीत डाव्या हातावर गोंदवलं आहे.
अँजेलीना जोली -या हॉलिवून अभिनेत्रीने पाठीवर डाव्या बाजूला पाली लिपीतलं एक टॅटू गोंदवून घेतलंय, मॅडॉक्सच्या जन्मानंतर तिने हा टॅटू काढला.
व्हेनेसा हजन्स - भारतीय संस्कृतीत नमस्ते म्हणण्यासाठी एकत्र हात जोडतो. व्हेनेसाला एक आयकॉनिक कल्पना सुचली आणि तिने दोन्ही हातांवर अर्धे अर्धे ओमचे टॅटू काढले आहेत. जेणे करून हात जोडल्यावर समोरच्याला अखंड ओम दिसेल.
रसेल ब्रँड -उजव्या हातावर संस्कृत वचन अनुगच्छतु प्रवाहं असं गोंदवून घेतलं आहे. रसेलने हे गोंदवल्यानंतर याच संस्कृत वचनाच्या टॅटूची क्रेझ वाढली.
केटी पेरी - अनुगच्छतु प्रवाहं हे संस्कृत वचन केटी पेरीनेही गोंदवून घेतलं आहे.
माइली सायरस - मनगटावर ओम असे टॅटू केले आहे . पॉप संस्कृतीत ओम खरोखर ट्रेंड करीत आहे असे दिसते .
टॉमी ली - ओम टॉमी लीने ओमचा टॅटू काढला आहे जो त्याच्या बेंबीच्या बरोबर खाली आहे,
जेसिका अल्बा - या हॉलिवूड स्टारच्या उजव्या मनगटावर पद्मा असा टॅटू काढला आहे .पद्मा म्हणजे कमळाचं फुल
एलिसा मिलानो - ओम एलिस मिलानोने तिच्या मानेवर ओम असा टॅटू काढला आहे. तिने असे सांगितले आहे की ओम या शब्दाचा तिच्या आयुष्यावर खोलवर परिणाम होतो.
गिलियन अँडरसन - देवनागरी लिपीतला अज्ञात शब्द तिच्या मनगटावर गोंदवलेला दिसतो. तिला संस्कृतमध्ये टॅटू करून हवं होतं. पण तिने देवनागरीत गोंदवलेल्या टॅटूचा अर्थ तिला देखील माहिती नाही.
अॅडम लेव्हिन - तपस (उच्चार: tá-pus) त्याचे शरीर एका रंगाच्या पुस्तकासारखे आहे. लेविनच्या शरीरावर बरेच टॅटू आहेत आणि त्यातील एक तपस आहे जो त्याच्या छातीच्या डाव्या बाजूला आहे.
Theo walcott थिओ वॉलकॉटने पाठीच्या कण्यावर ओम नमः शिवाय असं गोंदवून घेतलं आहे.
थीओ वॉलकोट हा फुटबॉलपटू आहे आणि त्याच्या चित्रविचित्र टॅटूसाठी प्रसिद्ध आहे.