जर तुम्हाला खूप खाज येण्याची समस्या असेल तर तुम्ही सुती कपड्यात बर्फाचे तुकडे ठेवून ते त्वचेवर लावू शकता. कोल्ड कॉम्प्रेसमुळे खाजेपासून आराम मिळतो. हे खाज आणि जळजळदेखील कमी करते.
जर तुमची त्वचा हायड्रेटेड आणि मऊ असेल तर कमी खाज येते. यासाठी आंघोळीनंतर त्वचेवर तेल लावा. तेल सुकत नाही तोपर्यंत खाज येत असलेल्या भागावर मसाज करा. दिवसातून दोनदा हे फॉलो करा. त्यामुळे खाज आणि जळजळीपासून आराम मिळतो.
खाज असलेल्या भागावर थोडा कोरफडीचा गर लावून मसाज करा. कोरफड जेल दिवसातून दोनदा लावल्याने खाज कमी होते. यामध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात जे त्वचेला मऊ करतात.
लिंबाच्या रसामध्ये प्रतिजैविक घटक असतात. त्यामुळे खाज कमी होते. लिंबाचा रस थोड्या पाण्यात मिसळून खाज येत असलेल्या भागावर लावल्यास खूप आराम मिळतो.
चंदनाची पावडर वापरल्यासही खाज कमी होते. एका भांड्यात चंदन पावडर आणि गुलाबपाणी मिसळा. ही पेस्ट खाज येत असलेल्या भागावर लावा आणि कोरडे होण्याची झाल्यानंतर थंड पाण्याने धुवा. याने खाजेपासून आराम मिळेल.
कडुलिंबात अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणधर्म असतात. कडुलिंबाच्या पानांचा उपयोग खाजेपासून आराम मिळवण्यासाठी पूर्वीपासून केला जात आहे. कडुलिंबाची पाने बारीक करून खाज येत असलेल्या ठिकाणी लावल्याने सर्व जंतू नष्ट होऊन आराम मिळतो.